Maruti Suzuki Manufaturing Record: मारुती सुझुकी भारतात हे नाव कोणाला माहित नसेल, असे कमीच लोक सापडतील. वाहन उत्पादक कंपनी ही भारताच्या प्रत्येक गावात आणि शहरात पोहोचली आहे. मारुती सुझुकीने 1983 मध्ये भारतात आपला प्रवास सुरू केला. तेव्हापासून मारुतीने एकापेक्षा एक अशा जबरदस्त कारचे उत्पादन केले आहे. कंपनीने डझनहून अधिक कार लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती देताना, मारुतीने सांगितले की, कंपनीने आतापर्यंत 2.5 कोटी प्रवासी कारचे उत्पादन केले आहे आणि असे करणारी ही एकमेव भारतीय कंपनी आहे.


मारुती सुझुकी भारतातील सुरुवात 


मारुती सुझुकीचा भारतातील प्रवास 1980 मध्ये गुरुग्राम, हरियाणा येथे असलेल्या उत्पादन केंद्रापासून सुरू झाला. M800 ही मारुती सुझुकीची पहिली कार होती. त्यातून भारतात ऑटोमोबाईल क्षेत्राची भरभराट होऊ लागली. सध्या मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये 16 कार आहेत आणि कंपनी लवकरच काही कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे.


मारुती सुझुकीच्या कारचे उत्पादन हरियाणात दोन ठिकाणी होते, पहिले गुरुग्राम आणि दुसरे मानेसर. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे वार्षिक कार उत्पादन 15 लाख युनिट्स आहे आणि असे करत मारुतीने भारतात आपला 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यासोबतच 2.5 कोटी कारच्या माध्यमातून लाखो लोकांचे कार घेण्याचे स्वप्नही सत्यात उतरले आहे.


मारुतीच्या प्रतिस्पर्धी कंपन्या


आपल्या गाड्यांच्या किफायतशीर किमती आणि उत्तम फीचर्समुळे कंपनी वर्षानुवर्षे भारतीय ऑटो मोबाइल बाजारावर राज्य करत आहे. परंतु आता काही कार उत्पादक मारुतीला तगडी स्पर्धा देण्याचा विचार करत आहेत. ज्यामध्ये ह्युंदाई, टाटा मोटर्स सारख्या कंपन्या आहेत. भारतात या कंपनीच्या कारलाही मोठी पसंती मिळत असून त्यांची विक्रीही अधिक आहे. यासोबतच महिंद्रा, किया आणि टोयोटाही चांगली कामगिरी करून मारुतीला आव्हान देत आहेत.


इतर महत्वाची बातमी: 


PMV EaS-E Micro : आकार लहान पण फीचर्स आहे छान! फक्त 4 लाखात येते ही इलेक्ट्रिक मिनी कार, 200 किमीची मिळणार रेंज


 


पण आता ग्राहकांची पसंती बदलत आहे आणि हे पाहता कंपनी बाजारात मारुती ब्रेझा आणि ग्रँड विटारा सारख्या बेस्ट सेलिंग एसयूव्ही कार विकत आहे. तसेच मारुती XL6, Ertiga, Baleno, Alto आणि Brezza या कारच्या फेसलिफ्ट आवृत्त्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI