Tata Electric SUV Cars : टाटा मोटर्स आगामी काळात आपल्या कारमध्ये मोठे बदल करण्याच्या ध्येयाकडे काम करत आहे. त्याची एक झलक ऑटो एक्सपोमध्ये पाहायला मिळाली. ईव्ही कारच्या बाबतीत इतर ऑटोमेकर्सना टक्कर देण्यासाठी टाटा प्रिमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही स्पेसमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे. 


इलेक्ट्रिक एसयूव्ही सिएरा डिझाइन 


टाटाची प्रीमियम एसयूव्ही सिएरा बॉक्सी लूकसह सादर करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यात चार डोअर देण्यात आले आहेत. त्याची एक्सटर्नल साईड या एसयूव्हीला एक संकल्पना स्वरूप देते. टाटा आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही सिएरा ही फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर करेल.


टाटा हॅरियर इलेक्ट्रिक एसयूव्ही 


ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा कडून आणखी एक मोठी ऑफर, टाटा हॅरियर इलेक्ट्रिक SUV होती. तथापि, टाटा ज्या प्रकारे आपल्या कार इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये सादर करत आहे. ते पाहता, त्याच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटचे आगमन आधीच अपेक्षित होते. त्याचे प्लॅटफॉर्म तयार असल्याने कंपनी त्वरीत त्याचे उत्पादन करू शकते. हॅरियर इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये सर्व व्हील ड्राइव्हसह ड्युअल मोटर लेआउट आहे. डिझेल हॅरियरमध्ये ते उपलब्ध नाही. 


टाटा हॅरियर इलेक्ट्रिक डिझाइन 


हॅरियर इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक कारचे एलिमेंट्स वापरले गेले आहेत. ज्यामध्ये फ्रंट बंपर लूक आणि नवीन अलॉय व्हील्सचा समावेश आहे. त्याच्या केबिनमध्ये सध्याच्या हॅरियरपेक्षा खूप मोठी स्क्रीन आहे. हॅरियर EV प्रथम येण्याची अपेक्षा आहे. सिएरा ईव्ही नंतर लॉन्च केली जाऊ शकते.


या दोन्ही इलेक्ट्रिक SUV सह, टाटा मोटर्स प्रीमियम ईव्ही सेगमेंटला लक्ष्य करत आहे. जेणेकरून टाटा ऑटो बाजारात आपला हिस्सा आणखी वाढवू शकेल. टाटाच्या या दोन्ही SUV मध्ये सर्व व्हील ड्राइव्हसह प्रीमियम EV तंत्रज्ञान वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. पण टाटा सध्याच्या डिझेल एसयूव्ही लाइन-अपसह या दोन एसयूव्हीची जागा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Auto Expo 2023 : टोयोटाची Corolla Cross H2 कॉन्सेप्ट कार भारतात सादर; 'हे' असेल खास वैशिष्ट्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI