Auto Expo 2023 India : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023), टोयोटाने बॅटरी इलेक्ट्रिक, फ्युएल सेल इलेक्ट्रिक, प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक, हायब्रिड इलेक्ट्रिक कार यांसह अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर आधारित आपल्या कारचे प्रदर्शन केले आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये टोयोटा कोरोला क्रॉस (Toyota Corolla Cross H2) हायड्रोजन कॉन्सेप्ट व्हेईकल देखील प्रदर्शित केले आहे.
Toyota Corolla Cross H2 कारचा लूक कसा आहे?
Corolla Cross H2 ही संकल्पना कार इतर कारसारखीच दिसते. कंपनीने दाखवलेले मॉडेल ड्युअल-टोन ब्लू आणि व्हाईट पेंट स्कीममध्ये केले आहे, जे अतिशय आकर्षक दिसते. टोयोटा कोरोला क्रॉस एच2 चा हुड हा जीआर कोरोला हॅचबॅक सारखा आहे. Toyota Corolla Cross H2 चे डिझाईन आणि स्टायलिंग क्रॉसओवरसारखे दिसते. यात ब्लॅक हाऊसिंग, स्लीक हेडलॅम्प्स आणि एक मोठा ब्लॅक रेडिएटर ग्रिल आहे. हेव्ही साइड बॉडी क्लेडिंग, स्क्वेअर-ऑफ व्हील आर्च आणि शार्क फिन अँटेना यामुळे हा स्पोर्टी लूक फारच आकर्षित करणारा आहे. तर त्याच्या मागील बाजूस रॅपराऊंड टेललॅम्प्स देण्यात आले आहेत.
कारची लांबी किती?
Corolla Cross H2 ची एकूण लांबी 4490mm, रुंदी 1825mm आणि उंची 1620mm आहे. तसेच, याचा व्हीलबेस 2640 मिमी आहे, ज्यामुळे केबिनची पुरेशी जागा आणि बूट स्पेस देखील उपलब्ध आहे.
Toyota Corolla Cross H2 चे इंजिन कसे आहे?
कारमध्ये 1.6-लिटर, 3-सिलेंडर इन-लाइन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 304bhp ची कमाल पॉवर आणि 370 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याचा 6-स्पीड iMT गिअरबॉक्स पुढच्या चाकांना पॉवर पाठवतो. यामध्ये सीट आणि बूट फ्लोअरच्या खाली दोन हायड्रोजन टॅंक देण्यात आले आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार...
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हायड्रोजन लिथियम आणि निकेलसारख्या मर्यादित पुरवठा घटकांची गरज देखील कमी करेल. फास्ट रिफिलिंगसह मुख्य ज्वलन गुणधर्मांमधील विद्यमान ICE टेक्नॉलॉजीचा लाभ घेता येईल. नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून घेऊन आणि गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा मिळवून, हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वेगाने कार्बन-कपात करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI