Auto Sales Report July 2022: वाहन उत्पादक कंपन्यांनी जुलै 2022 मध्ये विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. मारुती सुझुकीसोबतच ह्युंदाई, महिंद्रा, किया यांनी जुलै महिन्यात विक्रीत वाढ नोंदवली आहे. तर टोयोटा, टाटा यांनीही या महिन्यात सर्वाधिक मासिक विक्री केली आहे.
Maruti Suzuki
Toyota Kirloskar Motor
टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM) सोमवारी जाहीर केले की, कंपनीने जुलै 2022 मध्ये एकूण 19,693 युनिट्सची विक्री केली. जी भारतात कंपनी स्थापन झाल्यापासून एका महिन्यात निर्मात्याची आतापर्यंतची सर्वाधिक घाऊक विक्री आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील घाऊक विक्रीच्या तुलनेत ही वाढ 50 टक्क्यांनी वाढली आहे. TKM ने जुलै 2021 मध्ये 13,105 युनिट्सची विक्री केली. तर जून 2022 मध्ये घाऊक विक्री 16,500 युनिट्सची विक्री झाली. यात 19 टक्के वाढ झाली आहे.
Tata Motors
भारतातील प्रमुख तीन कार निर्मात्यांपैकी एक Tata Motors ने जुलैमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल 57 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 47,505 वाहनांची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 30,185 युनिट्सची विक्री झाली होती. एकूणच टाटा मोटर्सने जुलैमध्ये 81,790 वाहने विकली. ज्यात व्यावसायिक वाहने आणि निर्यात केलेल्या युनिटचा समावेश आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये 54,119 युनिट्सच्या तुलनेत एकूण विक्री 51 टक्क्यांनी वाढली आहे.
Hyundai
Mahindra
महिंद्रा अँड महिंद्राने सोमवारी सांगितले की, त्यांनी जुलै महिन्यात एकूण 56,148 वाहनांची विक्री केली. त्यापैकी जवळपास निम्मी एसयूव्ही लाइनअपची होती. 2020 मध्ये लाँच केलेल्या अपडेटेड थार आणि 2021 मध्ये लॉन्च झालेल्या XUV700 चे प्रचंड यश महिंद्राला चांगला नफा देत आहेत.
Kia
Kia India ने सोमवारी जुलैमध्ये घाऊक विक्रीत 47 टक्क्यांनी वाढ करून 22,022 युनिट्सची नोंद केली. तर जुलै 2021 मध्ये 15,016 युनिट्सची विक्री झाली. गेल्या महिन्यात कंपनीने सेल्टोसच्या 8,451 युनिट्स, सोनेटच्या 7,215 युनिट्स, कार्निव्हलच्या 5,978 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 288 युनिट्सची विक्री केली.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI