Tata Tiago NRG CNG: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Tata Motors ने आपल्या Tiago NRG चा CNG व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Tata Tiago NRG CNG व्हेरियंटची किंमत 7.40 लाख ते 7.80 लाख रुपये दरम्यान आहे. तसेच Tiago CNG व्हेरियंटची किंमत 6.35 लाख ते 7.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.


Tiago NRG XT आणि XZ प्रकारांना CNG पर्याय मिळतात. ज्यांची किंमत पेट्रोल-स्पेक प्रकारांपेक्षा 90,000 रुपये जास्त आहे. ग्राहक हे प्रकार देशभरातील त्यांच्या जवळच्या टाटा डीलरशिपवर बुक करू शकतात. Tata Tiago NRG ला 60-लिटरची CNG टाकी मिळेल. तसेच यामध्ये पुरेशी बूट स्पेस देखील मिळते. Tata Tiago NRG CNG हे 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे इतर प्रकारांप्रमाणे 84.82 BH पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. यात पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. CNG मोडमध्ये आउटपुट 73 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्कपर्यंत कमी होते.


फीचर्स 


Tata Tiago NRG CNG मध्ये ग्राहकांना अनेक फीचर्स मिळणार आहेत. यात डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.  याशिवाय यात स्टीयरिंग कॉलमजवळ इंधन स्विच बटण आणि मागील बाजूस  i-CNG बॅजिंग मिळते. याच्या मागील बाजूस रॅप-अराउंड टेललॅम्प आणि विंडो वाइपर देखील मिळतात. टाटाच्या नवीन Tiago NRG मॉडेलचा व्हीलबेस 2400mm आहे. तर ग्राउंड क्लीयरन्स 181mm आहे. सीएनजी खडबडीत रस्त्यांसाठी चांगली मानली जात नाही. परंतु कंपनीने म्हटले आहे की ही भारतातील पहिली खडबडीत रस्त्यांसाठी बेस्ट सीएनजी कार आहे.


Maruti Alto K10 CNG 


दरम्यान,  वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने देखील आपली नवीन K10 S-CNG सीरीजमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 5.95 लाख रुपये इतकी ठेवली(एक्स-शोरूम) आहे. ही कार VXI प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. CNG मोडमध्ये Alto K10 63.57 HP पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते. Alto K10 CNG चे मायलेज 33.85 kmpl इतके आहे, असा दावा कंपनीने केला आहे. Alto K10 मध्ये 1.0-लिटर के-सिरीज ड्युअल-जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे.


इतर महत्वाची बातमी: 


33.85 किमीचा जबरदस्त मायलेज, मारुती Alto K10 चा सीएनजी व्हेरिएंट लॉन्च


Car loan Information:

Calculate Car Loan EMI