TVS Raider vs Bajaj Pulsar 125 : जास्त पॉवर असलेल्या बाईकला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणूनच या सेगमेंटमध्ये अनेक बाईक बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी, दोन मॉडेल आहेत ज्यांना बाजारात विशेष मागणी आहे. या सेगमेंटमधल्या बाईक म्हणजेच TVS Raider आणि Bajaj Pulsar 125. आम्ही या दोन्ही बाईकची एकमेकांशी तुलना केली आहे. त्यामुळे तुम्ही जर बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणती बाईक चांगली हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  


दोन्ही बाईकचा लूक कसा आहे?


बजाज पल्सर 125 हुबेहूब पल्सर 150 सारखी दिसते, शार्प रियर एलईडी टेल लॅम्प, वुल्फ आय हेडलॅम्प्स, टँक शाउड्ससह मस्क्यूलर फ्युएल टँक. त्याचे लूक TVS Raider पेक्षा कमी प्रगत आहेत. पण तरीही ते भरपूर विकले जाते. दुसरीकडे, रेडरबद्दल बोलायचे तर, त्याचा लूक खूप एडव्हान्स आहे, ज्यामध्ये एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प्स, एलईडी हेडलॅम्प्स, मस्क्युलर फ्युएल टँक, बेली पॅन देण्यात आले आहेत. ती 125 cc कम्युटर बाईकसारखी दिसत नाही. 


बाईकची वैशिष्ट्ये काय? 


वैशिष्ट्यांची तुलना करताना, TVS raider मध्ये Pulsar 125 पेक्षा अनेक वैशिष्ट्ये आहेत. बाईकला सीटखाली स्टोरेज एलईडी लाइटिंग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, घड्याळ, एक यूएसबी पोर्ट, एक रिव्हर्स एलसीडी डिस्प्ले मिळतो. यात 5 इंचाची टीएफटी स्क्रीनही आहे.  


Pulsar 125 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टॅकोमीटर, बॅकलिट स्विचेस, टेल लॅम्प सारखी नेहमीची वैशिष्ट्ये मिळतात.  


मायलेज कसे आहे?


125cc सेगमेंटमध्ये बाईकचे मायलेज खूप महत्त्वाचे आहे. बजाज पल्सर 125 एक लिटर पेट्रोलमध्ये 35-60 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे, आणि जर TVS Raider बाईकबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 67 किमी पर्यंत धावू शकते. 


किंमत किती आहे?


Pulsar 125 ची एक्स-शोरूम किंमत 81,389 रुपयांपासून सुरु होते ती 90,003 रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, TVS Raider ची एक्स-शोरूम किंमत 85.973 रुपयांपासून सुरु होते ती 99.990 रुपयांपर्यंत आहे. रेडरची किंमत निश्चितच जास्त आहे परंतु ती इतर बाइक्सपेक्षा वेगळी दिसते आणि तिच्या आकर्षक आणि एडव्हान्स लूकमुळे ती आकर्षित करते 


महत्वाच्या बातम्या : 


Car Comparison : Citroen C3 की Nissan Magnite Turbo कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI