33.85 किमीचा जबरदस्त मायलेज, मारुती Alto K10 चा सीएनजी व्हेरिएंट लॉन्च
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली Alto K10 चा सीएनजी व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने याची किंमत 5.95 लाख रुपये इतकी ठेवली(एक्स-शोरूम) आहे. ही कार VXI प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. CNG मोडमध्ये Alto K10 63.57 HP पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते.
Alto K10 CNG चे मायलेज 33.85 kmpl इतके आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
मारुती सुझुकीचे म्हणणे आहे की, अपडेटेड Alto K10 ला बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. S-CNG लॉन्च केल्याने याची विक्री आणखी वाढू शकते.
Alto K10 मध्ये 1.0-लिटर के-सिरीज ड्युअल-जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे.
नवीन Alto K10 ची S-CNG सीरीज K-Series 1.0L Dual Jet, Dual VVT इंजिन देण्यात आले आहे. जे 5300RPM वर 41.7kW पॉवर आणि CNG मोडमध्ये 3400RPM वर 82.1Nm पीक टॉर्क जनरेट करते.
2022 मारुती अल्टो K10 चार मॅन्युअल आणि दोन AMT प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात Std, LXi, VXi आणि VXi+ चा समावेश आहे.
Alto K10 CNG बाजारात टाटा Tiago CNG ला टक्कर देणार आहे.
नवीन Alto K10 CNG सह मारुतीकडे देशात सर्वाधिक 13 S-CNG मॉडेल्स उपलब्ध आहेत.
याआधी मारुतीने आपले Ertiga, Baleno, XL6, Alto 800, Swift, Dzire, Alto K10, S-Presso, Tour S, WagonR, Eeco, Celerio, Super Carry मॉडेल देखील बाजारात उतरवले आहेत.