Sambhaji Bhide on Shivarajyabhishek : रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे,  शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.  संभाजी यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेकावर भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, असे विधान भिडे यांनी केले. या कुत्र्याचं राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भिडे यांनी केली. 

हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे

दरम्यान, पुण्यात हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीच्या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे म्हणाले की, हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. 

वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा

दरम्यान, रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या श्वानाबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी माहिती दिली आहे. रायगडावरील वाघ्या या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी याआधी शिवप्रेमींनीही केली आहे. मात्र ही समाधी हटवण्यात आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून ही समाधी कपोलकल्पित असून ती हटवावी अशी मागणी केली आहे. "हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि केंद्रीय संरक्षित स्मारक असलेल्या दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा आणि शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे", असं सभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या