Tata Motors Passenger Vehicles Price Hike: तुम्ही जर टाटा मोटर्सची कार खरेदी करण्याचा विचार करत असला, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने पुन्हा एका आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ कर्णाचा निर्णय घेतला आहे. कंपनीची ही नवीन दर वाढ 7 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची महिवटी कंपनीने दिली आहे. कंपनीने जाहीर केलेली ही दर वाढ प्रत्येक मॉडेल प्रमाणे वेगवेगळी असणार आहे. कंपनीची ही वाढ 0.90 टक्क्यांपर्यंत असेल. कंपनीने आपल्या कोणत्या कारची किती किंमत वाढवली आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.      


सध्या कार बनवणाऱ्या उपकरणांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे कार बनवण्याचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे कंपनीला कार बनवण्यास आधीपेक्षा जास्त खर्च येत आहे, जो कंपनीला आतापर्यंत स्वतःच सहन करावा लागत होता. मात्र आता वाहन निर्मितीचा अधिक वाढल्याने कंपनीने आपल्या कार्सच्या किंमतीत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं कंपनीची म्हणणं आहे. तत्पूर्वी कंपनीने जुलै महिन्यात आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत 0.55 टक्के वाढ केली होती. यामध्ये कंपनीच्या टाटा हॅरियर (Harrier), टाटा नेक्सन (Nexon), टाटा पंच (Punch ) आणि लोकप्रिय टाटा सफारीचा (Safari) समावेश आहे. ता पुन्हा कंपनीने आपल्या या कार्सच्या किंमत वाढ केली आहे. ज्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.          


याच दरम्यान नवरात्री ते दिवाळी या सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात (indian passenger vehicle sales in october) कंपनीच्या विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या कार विक्रीत या काळात 15.49 टक्के इतकी वाढ झाली आहे. कंपनीने या महिन्यात एकूण  78,335 वाहनांची विक्री केली आहे. तर सप्टेंबर महिन्यात कंपनीने  67,829 वाहनांची विक्री केली होती. कंपनीने या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपला विक्रीचा डेटा जाहीर केला होता. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्येही (Electric vehicle segment) चांगली कामगिरी केली आहे. देशात इलेक्ट्रिक कर सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. कंपनीने ऑक्टोबर (October) महिन्यात 45,423 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. दरम्यान, अलीकडेच कंपनीने आपली बहुप्रतीक्षित Tata Tiago इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने कार कारची बुकिंग देखील सुरु केली आहे. ग्राहक 21,000 रुपयांच्या टोकन रकमेसह या कारची बुकिंग करू शकतात. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI