Jaguar Land Rover Jobs: जगात पुन्हा एकदा मंदीचे सावट दिसून येत आहे. अमेरिकेतील अनेक मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर (Twitter), फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर रोजगाराचे संकट निर्माण होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत भारतातील दिग्गज टाटा कंपनीने अशा मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा मोटर्सने आपल्या ब्रिटीश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरमध्ये मेटा आणि ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे.
ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जग्वार लँड रोव्हर जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची संधी घेऊन येत आहे. कंपनी ट्विटर, मेटा सारख्या मोठ्या कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये नोकरी देणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी सेवेसोबतच डिजिटल सेवेत काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.
नोकरीबाबतची माहिती देताना जग्वार लँड रोव्हरने सांगितले की, ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना रोजगार देणार आहेत. कंपनीने आश्वासन दिले आहे की, ते सध्या सुमारे 800 नवीन रोजगार निर्माण करेल. यामध्ये डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिफिकेशन, क्लाउड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रातील लोकांना नोकरीची संधी देणार आहेत. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन, हंगेरी, आयर्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये 800 लोकांना नोकऱ्या देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Apple भारतात बंपर जॉब ऑफर
टाटा सोबतच आयफोन निर्माता कंपनी Apple ही भारतात लवकरच रोजगार निर्मिती करणार आहे. Apple ने बेंगळुरूमधील होसूर जवळ आपला कारखाना सुरू केला आहे. ज्याद्वारे ते भारतातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल. याबद्दल माहिती देताना दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशभरात 60 हजारांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. दरम्यान, ट्विटर आणि मेटाने अलीकडच्या काळात हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. इलॉन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरनंतर त्यांनी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याशिवाय फेसबुकच्या मूळ कंपनीनेही आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.
इतर महत्वाची बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI