Pmv Eas-E Electric Car Booking: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी प्रमाणात विक्रीत होत आहे. मात्र यातही बरेच असे लोक आहेत, ज्यांना इलेक्ट्रिक कार घेणं परवडत नाही. याच कारण म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या अधिक किंमत. सामान्य डिझेल आणि पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक कारच्या किंमत या अधिक आहेत. यातच वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार  Tata Tiago EV लॉन्च केली होती. ज्याची किंमत 8.49 लाख रुपये आहे. मात्र आता यापेक्षाही स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली आहे. मुंबईची स्टार्टअप कंपनी पर्सनल मोबिलिटी व्हेइकल्स (PMV) ने आपली Eas-E इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे.


ही इलेक्ट्रिक कार भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. या कारचे बुकिंगही सुरू झाले आहे. जर तुम्हाला ही कार बुक करायची असेल तर तुम्ही फक्त 2000 रुपयांमध्ये ही कार बुक करू शकता. या कारची संपूर्ण रक्कम डिलिव्हरीच्या वेळी भरावी लागेल. कंपनी कारचे फक्त सुरुवातीचे 10 हजार युनिट्स 4.79 लाख रुपयांमध्ये देईल, नंतर कंपनी याची किंमत वाढू शकते. PMV ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आतापर्यंत 6,000 कारचे बुकिंग मिळाले आहे. EAS-E च्या एकूण बुकिंगमध्ये भारतातील आणि परदेशातील ग्राहकांचाही समावेश आहे. 


कशी कराल बुक? 


कंपनीची वेबसाइट pmvelectric.com वेबसाइटवर तुम्हाला प्री ऑर्डर बुकिंगचा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा यानंतर एक फॉर्म उघडेल. त्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा. त्यानंतर प्री-बुकिंगवर क्लिक करा, तुम्हाला पेमेंटचे पर्याय दिसतील. इथे तुम्ही पैसे देऊन गाडी बुक करू शकता. 


60 रुपयात धावणार 160 किमी  


पीएमव्हीची ही इलेक्ट्रिक कार शहरांमध्ये चालविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. EAS-e एका चार्जवर 160 किमीची रेंज देते. यात समोर आणि मागे प्रत्येकी एक सीट आहे. एकूणच कारला डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एसी, क्रूझ कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट मिळते. ही कार अंदाजित 60 रुपयांच्या खर्चात 160 किमी धावू शकते. सेफ्टी फीचर्समध्ये यात एअरबॅग आणि सीट बेल्ट सारखी फीचर्स उपलब्ध असतील. तसेच कारमध्ये विविध राइडिंग मोड, पाय-फ्री ड्रायव्हिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन आणि कनेक्टेड स्मार्टफोन स्मार्टफोनवरून कॉल कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे.  दरम्यान, PMV इलेक्ट्रिक कारनंतर Tata Tiago EV दुसरी सर्वात स्वस्त कार बनली आहे. याची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांदरम्यान आहे. यात ग्राहकांना दोन दोन बॅटरी पॅक मिळतात. 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI