Tata Harrier & Safari Price Hiked: टाटा मोटर्सने नुकतेच आपल्या सफारी आणि हॅरियरचे रेड डार्क एडिशन लॉन्च केले आहेत. यानंतर कंपनीने या दोन्ही कारच्या काही व्हेरिएंटवर सूट दिली. आता यानंतर टाटा मोटर्सने या दोन्ही कारच्या किमती वाढवल्या आहेत. यावर्षी कंपनीने दुसऱ्यांदा या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी कंपनीने यांच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवल्या होत्या. आता कंपनीने या कार्सच्या किमतीत किती वाढ केली आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ..


Tata Harrier & Safari Price Hiked: किती वाढली किंमत? 


टाटा मोटर्सने यावेळी या गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. यावेळी कंपनीने हॅरियरच्या किमतीत 47,000 रुपयांनी आणि सफारीच्या किमतीत 66,000 रुपयांनी वाढ केली आहे. या कारच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या कारच्या काही व्हेरियंटमध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS आणि मोठी टचस्क्रीन जोडण्यात आली आहे. किमतीत वाढ फक्त या दोन गाड्यांवर करण्यात आली आहे, इतर सर्व मॉडेल्सच्या किमती पूर्वीप्रमाणेच आहेत.


कंपनीने या दोन कारचे 26 प्रकार बंद केले 


आतापर्यंत Tata Harrier SUV चे 30 प्रकार बाजारात उपलब्ध होते, तर 36 प्रकार Tata Safari बाजारात उपलब्ध होते. म्हणजेच या दोन्ही कारचे एकूण 66 व्हेरियंट होते. पण आता कंपनीने या दोन्ही कारचे 26 व्हेरियंट बंद केले आहेत. कंपनीने आपल्या हॅरियर लाइनअपमध्ये रेड डार्क एडिशनच्या 2 नवीन प्रकारांना स्थान दिले आहे, त्यानंतर ही कार आता एकूण 20 प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. तर टाटा सफारीचे 4 नवीन रेड डार्क प्रकार या लाइनअपमध्ये जोडले गेले आहेत, ज्यानंतर त्याच्या प्रकारांची एकूण संख्या 26 झाली आहे. नेक्सन डार्क एडिशनबद्दल बोलायचे झाले तर हे कार आपल्या सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. कंपनीने याच्या नवीन डार्क एडिशनमध्ये, डार्क थीम आणि  ठळक ओबेरॉन ब्लॅक बॉडी कलरमध्ये बाह्य भाग सादर केला आहे.


Tata Dark Red Edition Cars: Tata Nexon, Harrier, Safari चे रेड डार्क एडिशन


दरम्यान, टाटा मोटर्सने अलीकडेच एसयूव्ही नेक्सन , हॅरियर आणि सफारी या वाहनांचे डार्क एडिशन (Dark Edition) लॉन्च केले. कंपनीने या तिन्ही एसयूव्हीमध्ये असे फीचर्स दिले आहेत, जे याला नियमित व्हर्जनपेक्षा वेगळे बनवते. आता ग्राहकांना Tata Harrier आणि Safari Dark Edition मध्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये 6 भाषांमध्ये 200 हून अधिक व्हॉईस कमांडसह 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, मेमरी आणि वेलकम फंक्शन, 26.03 सेमी हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 17.78 सेमी डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 सराउंड व्ह्यू सिस्टीम आणि अॅडव्हान्स सेफ्टीसाठी ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI