Suzuki Motor : जपानी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी भारतात मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. सुझुकी भारतात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे भारतामध्ये भविष्यात ऑटो क्षेत्रांमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी कंपनी भारतात 126 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक गाड्या आणि बॅटरींची निर्मिती करणार आहे. जपानमधील वर्तमानपत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.  


मारुती सुझुकी भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मिती कंपनीपैकी एक आहे. मारुती सुझुकीसारखी कंपनी भारतात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतामध्ये इलिक्ट्रिक वाहांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शनिवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात फुमियो किशिदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यावेळी ते मारुती सुझुकी भारतात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा करु शकतात. Nikkei business daily च्या वृत्तानुसार,  पुढील पाच वर्षात सुझुकी भारतामध्ये 5 trillion yen ची गुंतवणूक करणार असल्याचे समजतेय.


मारुती सुझुकीने बारतात नवीन इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे, असे सुत्रांनी सांगितले आहे. मात्र मारुती सुझुकीकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती जाहीर कऱण्यात आलेली नाही.  


जपानचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर –
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. किशिदा 19 आणि 20 मार्च रोजी दिल्लीत असणार आहेत. दिल्लीमध्ये भारत-जपान समिटमध्ये ते सहभागी होणार आहेत. भारताच्या विदेश मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.  विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता  अरिंदम बागची म्हणाले की, भारत-जपान शिखर संमेलन 19 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यामध्ये सहभागी होत आहेत. ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भेट होणार आहे. या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट होणार आहेत. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI