Sunroof Cars Under 12 Lakh Rupees : कार खरेदी करताना कुणीही पहिल्यांदा दोन गोष्टी समोर ठेवतो, एक म्हणजे कारची किंमत आणि दुसरं म्हणजे कारची वैशिष्ट्ये. मोकळ्या वाहनातून प्रवास करण्याची आवड असलेल्यांसाठी सनरूफ फीचर असलेल्या कार बाजारात आणण्यात आल्या आहेत आणि त्याही किफायतशीर किमतीत. तुम्हालाही अशा कार घ्यायच्या असतील तर 12 लाख रुपयांच्या आतील कार्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
यामध्ये टाटा, मारुती सुझुकी आणि महिंद्राच्या शक्तिशाली आणि नवीनतम मॉडेल्सचा समावेश आहे.


टाटा पंच (Tata Punch)


टाटा पंचचे 25 प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या कारचे दरवाजे 90 अंशांपर्यंत उघडता येतात. टाटा कारमध्ये व्हॉईस असिस्टेड सनरूफची सुविधा देण्यात आली आहे. या कारमध्ये 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7-इंचाचे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. टाटाच्या या कारमध्ये सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी 4 स्पीकर आणि दोन ट्विटर देखील बसवण्यात आले आहेत. टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 6,12,900 रुपयांपासून सुरू होते.


Mahindra XUV 3XO (Mahindra XUV 3XO)


Mahindra XUV 3XO ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. या कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. या कारमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 82 kW ची पॉवर आणि 200 Nm टॉर्क देते. तर त्याचे 1.2-लीटर TDGi पेट्रोल 96 kW पॉवर आणि 230 Nm टॉर्क जनरेट करते आणि 1.5-लीटर टर्बो डिझेल 86 kW पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते.


या महिंद्रा कारमध्ये 940 mm x 870 mm चा स्कायरूफ देखील आहे. या कारमध्ये हरमन कार्डन ऑडिओ सिस्टीमही बसवण्यात आली आहे. महिंद्राच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते.


मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza)


मारुती सुझुकी ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफचे फीचर देण्यात आलं आहे. याशिवाय या कारमध्ये हेड अप डिस्प्ले देखील आहे. कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधा देखील देण्यात आली आहे. तुम्ही ही कार तुमच्या फोनलाही कनेक्ट करू शकता. ब्रेझा ही एक स्मार्ट हायब्रीड कार आहे.


या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये K15C 1462cc इंजिन आहे जे पेट्रोल मोडमध्ये 6,000 rpm वर 100.6 PS चा पॉवर देते आणि 4,400 rpm वर 136.0 Nm टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते.


ही बातमी वाचा: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI