Bajaj CNG Motorcycle : बजाज ऑटो जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही बाईक किमतीनुसार जास्त मायलेज देऊ शकते. या सीएनजी बाईकची सर्व माहिती मोटारसायकल लॉन्च करताना दिली जाईल. बजाजची बाईक 5 जुलै रोजी लाँच होत आहे.


बजाजच्या सीएनजी बाईकचे इंजिन


बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये 125 सीसी इंजिन मिळू शकते. या बाईकमध्ये रायडरच्या सीटखाली सीएनजी टाकी बसवता येते किंवा त्याचे इंजिन या बाईकच्या स्ट्रक्चरला जोडले जाऊ शकते. पेट्रोलच्या टाकीची जागा बदलण्यात येणार नाही, पण सीएनजीमुळे ती काहीशी कमी आकाराची असू शकते.


बजाज सीएनजी मोटरसायकलची किंमत (Price Of Bajaj CNG Motorcycle)


कंपनीचा इतिहास पाहता बजाज सीएनजी मोटरसायकल ही सर्वात कार्यक्षम दुचाकी असू शकते. पेट्रोल मोटारसायकलच्या वाढत्या किमती लक्षात घेता या बाईकची किंमत लक्षणीय ठरणार आहे. बजाज कंपनीचा इतिहास पाहता कंपनीने ही बाईक खरेदीदारांसाठी प्रीमियम बनवलेले नसल्याची माहिती आहे. कारण वाहनाच्या प्रीमियम स्वरूपामुळे त्याची किंमत वाढते आणि सर्वसामान्य ग्राहकांना अधिक महाग बाईक खरेदी करायला आवडत नाही.


सीएनजी बाईकची वैशिष्ट्ये काय? 


या 125 सीसी इंजिन बाईकमध्ये कोणीही पेट्रोलवरून CNG वर जाऊ शकतो. पण ही बाईक फक्त पेट्रोलवर सुरू होईल. या बाईकमध्ये आणखी एक गोष्ट पाहण्यासारखी असेल आणि ती म्हणजे या बाईकचे वजन. यासह या बाईकचे बहुतांश तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत.


5 जुलै रोजी बाजारात येणार


किमतीच्या दृष्टिकोनातून बजाज या बाईकचे अनेक प्रकार बाजारात आणू शकते. कमी किमतीमुळे ही बाईक मोटरसायकल सेगमेंटमध्ये गेमचेंजर ठरू शकते. ही बाईक 5 जुलै रोजी लाँच होणार असून सर्व तपशिल त्याच दिवशी समोर येणार आहेत. 


ही बातमी वाचा: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI