Hyundai unveils Ioniq 5 EV in India: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Ioniq 5 सादर केली आहे. कंपनीने 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह इलेक्ट्रिक एसयूव्हीची बुकिंग सुरू केली आहे. ही कार ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बुक करू शकतात. Hyundai Kona EV नंतर ही कंपनीची भारतातील दुसरी इलेक्ट्रिक SUV आहे. देशांतर्गत बाजारात Ioniq 5 Kia EV6 आणि Mercedes-Benz EQB शी स्पर्धा करेल. Hyundai ची ही फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV Hyundai मोटर ग्रुपच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (eGMP) तयार करण्यात आली आहे. Kia Motor देखील त्याच प्लॅटफॉर्मवर EV6 तयार करत आहे.


Hyundai unveils Ioniq 5 EV in India: 5 मिनिटांच्या चार्जमध्ये मिळणार 100 किलोमीटरची रेंज 


कंपनीने Ioniq 5 बद्दल काही माहिती देखील उघड केली आहे. या कारमध्ये 72.6 kW लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे, जी केवळ 5 मिनिटांच्या चार्जमध्ये 100 किलोमीटरची रेंज देऊ शकते. या कारमध्ये मनोरंजनासाठी हाय-एंड ऑडिओ स्पीकर आणि म्युझिक सिस्टिम देण्यात आली आहे. ही कार केवळ 5 सेकंदात 0-100 किमीचा वेग पकडू शकते. तसेच याची एका चार्जवर 631 किलोमीटरची रेंज आहे, जी ARAI द्वारे प्रमाणित आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लेव्हल-2 एडीएएस फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय कारमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, बोस साउंड सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सारख्या फीचर्स आहेत.


दरम्यान, Hyundai Motor Group ने जाहीर केले आहे की, कंपनी 2025 पर्यंत जागतिक बाजारपेठेत 10 लाख इलेक्ट्रिक कार विकणार आहे. जागतिक इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत 10 टक्के वाटा तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जपान आणि युरोपियन युनियनने 2030 नंतर फक्त इलेक्ट्रिक कार विकण्याचा कायदा केला आहे. यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढणार आहे. कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे इलेक्ट्रिक वाहनांचे प्रकार वाढतील तसेच किंमतीही कमी होतील.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातम्या: 


Electric Moped Bike: 'ही' इलेक्ट्रिक मोपेड चालवण्यासाठी 'ड्रायव्हिंग लायसन्स;ची गरज नाही, देते 55 किमीची रेंज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत





 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI