Royal Enfield Electric Bike: रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) ही दुचाकी निर्माती कंपनी भारतीय बाजारात उत्तम कामगिरी करत आहे. रॉयल एनफिल्ड 2025 पर्यंत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपली बाईक (Royal Enfield Electric Bike) लॉन्च करणार आहे. रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनी लवकरच विशिष्ट इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार करेल, अशी माहिती रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन यांनी दिली आहे. कंपनीने चेन्नईतील (Chennai) त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये (Manufacturing Plant) इलेक्ट्रिक बाईकसाठी लागणारे धोरण, त्याची चाचणी घेण्यावर चर्चा आणि प्रयोग सुरू केले आहेत. तर, पुरवठा साखळी (Supply Chain) विकसित करण्यासाठी आणि नेटवर्क वाढवण्यासाठी कंपनीने गुंतवणूक सुरू केली आहे.
कंपनीने सुरू केली तयारी
सध्याची ICE श्रेणी, नवीन उत्पादन विकास आणि EV उत्पादनासाठी आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 1,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. रॉयल एनफिल्ड चेय्यर (Royal Enfield Cheyyar) चेन्नईमध्ये तिसरा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट (Royal Enfield Manufacturing Plant) उभारण्याच्या तयारीत आहे. जे कंपनीसाठी ईव्ही (Electric Vehicle) उत्पादन केंद्र म्हणून काम करेल. सध्या कंपनीकडे दुचाकी वाहनांसाठी वल्लम येथे ईव्ही उत्पादन प्रकल्प (EV Manufacturing Project) आहे आणि तो चेय्यार प्लांटला जोडला जाईल. वर्षाला 1 लाख इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे रॉयल एनफिल्ड कंपनीचे प्रारंभिक लक्ष्य आहे. संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सुरू आहे, त्यामुळे कार असो किंवा बाईक अथवा स्कूटर प्रत्येक विभागात इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली जात आहेत.
नवीन प्लॅटफॉर्मवर होणार तयार
रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) नवीन इलेक्ट्रिक बाईक नवीन 'L' प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली जाईल. त्याचे मॉडेल्स स्पॅनिश ईव्ही दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आणि स्टार्क फ्यूचर एसएल (Stark Future SL) यांच्या सहकार्याने विकसित केले जातील. रॉयल एनफिल्डची मूळ कंपनी आयशर मोटर्सने (Eicher Motors) गेल्या वर्षी स्टार्क फ्यूचर एसएल (Stark Future SL) मध्ये गुंतवणूक केली होती.
दोन्ही कंपन्यांनी आयशर मोटर्ससाठी (Eicher Motors) इलेक्ट्रिक बाईक, टेक्नॉलॉजी शेअरिंग, टेक्निकल लाइसेंसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये भागीदारी केली आहे. रॉयल एनफिल्डच्या (Royal Enfield) इलेक्ट्रिक बाईकचा परफॉर्मन्स खूप चांगला असेल. कंपनीचे 'L' प्लॅटफॉर्म एकापेक्षा जास्त बॉडी स्टाइलला सपोर्ट करते जे L1A, L1B आणि L1C असे विभागलेले आहेत.
हेही वाचा:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI