Yamaha R15: दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटारने (Yamaha Motor) भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक YZF-R15 V4 मोटारसायकल अपडेट केली आहे. बाईकला नवीन 'डार्क नाइट' कलर स्कीम देण्यात आली आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.82 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक रेड, ब्लू आणि इंटेन्सिटी व्हाईट अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रंग वगळता, यामाहा R15 V4 डार्क नाईट (Yamaha R15 V4 Dark Night) मध्ये इतर कोणतेही बदल केलेले नाहीत.
इंजिन
बाईकमध्ये 155cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 18.4bhp पॉवर आणि 14.2Nm टॉर्क जनरेट करते. यात ट्रान्समिशन ड्युटी असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. याशिवाय, यात 282 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक (Front Disc Brake) आणि 220 मिमी रियर डिस्क ब्रेक (Rear Disc Brake) मिळतो. या बाईकमध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम देखील उपलब्ध आहे. यासोबतच बाईकमध्ये USD फ्रंट फोर्क आणि रिअर मोनोशॉक उपलब्ध आहेत.
वैशिष्ट्ये
यामाहा R15 V4 (Yamaha R15 V4)ची लांबी 1990mm, रुंदी 725mm आणि उंची 1135mm आहे आणि 1325mm चा व्हीलबेस आहे. ही बाईक 170mm च्या ग्राउंड क्लीयरन्स आणि 815mm च्या सीट उंचीसह येते. यात बाय फंक्शनल हेडलाइट, एलईडी पोझिशन लाइट, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, फुल डिजिटल एलसीडी मीटर कन्सोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, यामाहा वाय-कनेक्ट अॅप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
यामाहा लवकरच आणणार नवीन मॉडेल
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी लवकरच यामाहा MT-03 आणि Yamaha R3 भारतात परत आणणार आहे. दोन्ही मॉडेल्सना 321cc, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळेल, जे 42PS पॉवर आणि 29Nm टॉर्क जनरेट करते. यात 298mm अपफ्रंट डिस्क आणि 202mm रियर ब्रेक आहे. सस्पेंशन सेटअपमध्ये USD फोर्क आणि लिंक्ड मोनोशॉक युनिट समाविष्ट आहे. पुढील काही महिन्यांत, कंपनी MT-03 स्पोर्ट्स नेकेड बाईक, MT-07 आणि MT-09 स्ट्रीट नेकेड बाईक देखील सादर करणार आहे.
कोणाशी स्पर्धा करते यामाहा बाईकची नवीन एडिशन?
यामाहा R15 V4 ही बाईक TVS Apache RTR 200 4V शी स्पर्धा करते. ज्याची सुरुवातीची किंमत 1,42,928 रुपये आहे. ही बाईक 2 मॉडेल आणि 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 197.75cc BS6 इंजिन आहे.
हेही वाचा:
Nissan SUV X-TRAIL : फाॅरच्युनरला टक्कर देण्यासाठी निस्सान एक्स ट्रेल एसयूव्ही भारतात होणार लाँच
Car loan Information:
Calculate Car Loan EMI