Royal Enfield Super Meteor 650: रॉयल एनफिल्डने 2022 EICMA मध्ये आपली Super Meteor 650 बाईक प्रदर्शित केली होती. यानंतर गोव्यात झालेल्या रायडर मॅनियामध्ये ही बाईक भारतात लॉन्च करण्यात आली. आता कंपनी ही क्रूझर बाईक पुढील वर्षी 2023 मध्ये तिचे पहिले उत्पादन म्हणून लॉन्च करणार आहे. या बाईकच्या किमती जानेवारीमध्ये समोर येऊ शकतात. ही कंपनीची भारतातील सर्वात महागडी बाईक असेल. ज्याची सुरुवातीची किंमत 3.5 लाख रुपये ठेवली जाऊ शकते आणि त्याच्या टूरर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 4 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
ही बाईक दोन प्रकारात येईल
कंपनीने आधीच माहिती दिली आहे की, Super Meteor 650 दोन प्रकारांमध्ये येईल, ज्यामध्ये स्टॅंडर्ड प्रकार इंटरस्टेलर (ग्रे आणि हिरवा) आणि एस्ट्रल (निळा, काळा आणि हिरवा) पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. त्याचे टूरर सेलेस्टियल व्हेरिएंट (ब्लू आणि रेड) पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. ही कंपनीची तिसरी बाईक आहे, जी 650cc प्लॅटफॉर्मवर ऑल-न्यू चेसिससह तयार केली गेली आहे.
फीचर्स
या क्रूझर बाईकमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. जे कंपनीच्या इतर कोणत्याही बाईकमध्ये उपलब्ध नाहीत. बाईकला ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, Showa USD फोर्क सस्पेन्शन, स्टँडर्ड फिटिंग्ज म्हणून पूर्ण एलईडी हेडलॅम्प मिळेल. तर Tourer व्हेरियंटला या फीचर्सव्यतिरिक्त मोठा विंडस्क्रीन आणि पिलियन पर्च मिळेल. यासोबतच या बाईकमध्ये बॅक रेस्टही मिळेल.
इंजिन
नवीन रॉयल एनफील्ड 650cc बाईकला तेच 648cc इंजिन मिळेल. जे G Interceptor 650 आणि Continental GT 650c मध्ये देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 7,250rpm वर 47bhp ची कमाल पॉवर आणि 52 Nm टॉर्क जनरेट करते. रॉयल एनफिल्डचा दावा आहे की, या क्रूझर बाईकच्या इंजिनमध्ये मॅपिंग आणि गियरिंग सुधारले आहे आणि 2,500rpm वर 80% अधिक पीक टॉर्क जनरेट करू शकते.
KTM 390 Duke शी होणार स्पर्धा
KTM 390 Duke भारतीय बाजारात 2,94,976 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. हे 373.27cc BS6 इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 42.9 bhp पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकला समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम मिळते. याची इंधन टाकी क्षमता 13.4 लीटर आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
New Tata Safari: येत आहे नवीन टाटा सफारी, मिळणार ADAS फीचर; एमजी हेक्टर प्लसला देणार टक्कर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI