New Tata Safari Features: 2021 मध्ये जेव्हा ऑल-न्यू Tata Safari SUV लॉन्च करण्यात आली होती, तेव्हा कोणत्याही 4X4 पर्यायाशिवायही तिच्या डिझाइन आणि प्रीमियम अपीलमुळे ती देशात खूप लोकप्रिय झाली होती. यानंतर याचे अनेक व्हर्जन आणि रंग अपडेट देखील करण्यात आले. पण आता यात एक मोठे अपडेट मिळणार आहे. अलीकडे सफारीच्या फेसलिफ्ट केलेल्या व्हर्जनची भारतीय रस्त्यांवर टेस्ट करण्यात आली. टाटा मोटर्स 2023 ऑटो एक्सपोमध्ये अपडेटेड सफारीचे अनावरण करेल, अशी अपेक्षा आहे. कशी असेल कंपनीची ही नवीन अपडेटेड सफारी आणि यात कोणते फीचर्स दिले जाऊ शकतात याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ..
New Tata Safari Features: ADAS फीचरने असेल सुसज्ज
नवीन सफारीची अद्याप टेस्ट सुरु असून याच्या डिझाइनबद्दल अचूक माहिती देणे कठीण आहे. याच्या समोरचा सिल्हूट सध्याच्या मॉडेलसारखा दिसत असला तरी त्याच्या खालच्या फ्रंट बंपरमध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) सेन्सर्स दिले जाऊ शकते. नवीन टाटा सफारीमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट कोलिजन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारखी ADAS फीचर्स मिळतील.
याचा उपराईत सिल्हूट सध्याच्या मॉडेलसारखाच असेल. यात नव्याने डिझाइन केलेले पुढील आणि मागील बंपर, नव्याने डिझाइन केलेले हेडलॅम्प सेटअप, अपडेटेड टेल-लाइट्स आणि नवीन अलॉय व्हील मिळू शकतात. टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या कारमध्ये सध्याचेच 18 इंची अलॉय व्हील्स दिसले आहेत.
इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास याच्या केबिनचे लेआउट डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच राहण्याची अपेक्षा आहे, परंतु या SUV ला कनेक्टेड कार टेकसह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम सारखे मोठे अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, 360-डिग्री कॅमेरा, ऑल न्यू एलईडी हेडलॅम्प, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह अनेक नवीन फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
New Tata Safari 2023: इंजिन
2023 सफारीमध्ये 2.0-लीटर टर्बो-डिझेल आणि नवीन 1.5-लीटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळू शकतो. यात 6-स्पीड एमटी आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल.
एमजी हेक्टर प्लसशी होणार स्पर्धा
नवीन सफारी लवकरच लॉन्च होणाऱ्या एमजी हेक्टर प्लस फेसलिफ्टशी स्पर्धा करेल. ही कार 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह माईल्ड-हायब्रिड आणि नॉन-माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असेल. 2.0-लिटर फियाट-सोर्स्ड टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर डिझेल इंजिनचा पर्याय देखील असेल.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI