Royal Enfield : कितीही आधुनिक गाड्या बाजारात (Cars market) आल्या तरी दुचाकीचं अर्थात बाईक्सचं (Bikes Market) वेड कायम राहणार आहे. त्यात Royal Enfield कंपनीच्या बाईक्सची बातच काही और! दरम्यान या कंपनीने 120 वर्षपूर्तीवर 650 GT आणि Interceptor 650 या बाईक्सचे अॅनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केले. यावेळी ग्राहकांच्या तुफान प्रतिसादामुळे अवघ्या 2 मिनिटांत 120 बाईक्स विकल्या गेल्या.  


कंपनीने यावेळी प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या धोरणावर बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या. ज्यानंतर भारतीय वेळेनुसार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कंपनीने बाईक्स वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध केल्या. यावेळी बाईकसह एक स्पेशल ब्लॅक-आउट रॉयल एनफील्ड जेनुइन मोटरसायकलिंग एक्सेसरीज किट देखील सामाविष्ट आहे. या लिमिटेड एडिशनच्या एकूण 480 बाईक्स जगभरात विकण्यात येणार आहेत. ज्यातील 120 यूनिट्स भारतात विकले जाणार आहेत. यावेळी अगदी वेगळ्या कलर्ससह गाडीच्या रचनेतही काहीसे बदल करण्यात आले आहेत. 


कशा आहेत लिमिटेड एडिशन बाईक्स?


अॅनिव्हर्सरी एडिशनच्या या बाईक्समध्ये 648cc पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आलं असून 7150 RPM वर 47 bhp आणि 5250 RP वर 2 Nm पर्यंत अधिक टॉर्क जनरेट या बाईक्स करतात. यामध्ये 6-स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलं आहे. तसंच दोन्ही बाईक्समध्ये हँडक्राफ्टेड ब्रास बॅज, हँथ प्रिंटेड पिनस्ट्रिप आणि ब्लॅक क्रोम फिनिश दिलं गेलं आहे. तसंच प्रत्येक बाईकच्या टँकवर एक विशेष नंबरही देण्यात आला आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI