मुंबई : रेनॉ इंडिया या रेनॉ ग्रुपच्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनीने ग्राहकांसाठी स्टॅण्डर्ड ३-वर्ष किंवा १,००,००० किमी वॉरंटीच्या लाँचची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून लागू होणाऱ्या या वॉरंटीमध्ये सर्व मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल फेलर्स किंवा साहित्य, कारागिरीशी संबंधित दोष किंवा उत्पादन दोषांसाठी कव्हरचा समावेश आहे, ज्यामधून प्रत्येक रेनॉ मालकाला मन:शांतीची खात्री मिळते.
आपल्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक दृढ करत रेनॉ आता उद्योगातील सर्वोत्तम ७-वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटर एक्स्टेण्डेड वॉरंटी पॅकेजेस देते, जे स्टॅण्डर्ड वॉरंटी कालावधीदरम्यान कधीही खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्टॅण्डर्ड व एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम्समध्ये कॉम्प्लीमेण्टरी २४x७ रोडसाइड असिस्टण्सचा समावेश आहे, ज्यामध्ये अपघात स्थितीत टोईंगचा समावेश आहे, ज्यामुळे मालकीहक्क अनुभव अधिक उत्साहित होतो.
रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व कंट्री सीईओ श्री. वेंकटराम म्हणाले, "रेनॉचा नाविन्यपूर्ण, विश्वसनीय सोल्यूशन्स वितरित करण्याचा वारसा आहे, ज्याने ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. २०२५ मध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व वेईकल्सवर लाँच करण्यात आलेल्या स्टॅण्डर्ड ३-वर्ष वॉरंटीसह आम्ही आमच्या कार्सच्या दर्जावरील आत्मविश्वास आणि मालकीहक्क अनुभव अधिक उत्साहित करण्याप्रती समर्पितता अधिक दृढ करत आहोत. आम्हाला अशी मोठी खरेदी करताना मन:शांतीचे महत्त्व माहित आहे आणि या उपक्रमामधून आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्राहकांना प्राधान्य देण्याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येजे, ज्यामुळे प्रत्येक प्रवास उत्साहवर्धक व विनासायास असण्याची खात्री मिळते."
रेनॉ सिक्युअर उपक्रमांतर्गत एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम्सची श्रेणी पुढीलप्रमाणे आहे:
● ४ वर्षे / १,००,००० किमी (जे अगोदर असेल ते),
● ५ वर्षे / १,२०,००० किमी (जे अगोदर असेल ते),
● ६ वर्षे / १,४०,००० किमी (जे अगोदर असेल ते),
● ७ वर्षे / अनलिमिटेड किलोमीटर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI