Luxury Bikes : सध्या चारचाकी वाहनाबरोबरच दुचाकी वाहनाला देखील बाजारात विशेष मागणी आहे. जर तुम्ही दुचाकी वाहनाचे चाहते असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही बाईकची माहिती सांगणार आहोत ज्या त्यांचा इंजिन, लूक आणि फिचरमुळे इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. या बाईकना बाजारात विशेष मागणी आहे. इंजिन आणि लूकच्या बाबतीत या बाईक्स खूप वेगळ्या वाटतात.
मोटो मोरीनी
या कंपनीने गेल्या महिन्यात भारतात आपल्या चार मोटारसायकली लाँच केल्या आहेत. या बाईकमध्ये Ciamezzo Retro Street Roadster, Cimezzo Scrambler, X-Cap 650 Standard आणि X-Cap 650 अलॉय मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने या बाईक 6.89 लाख रुपये किमतीत लॉन्च केल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार या बाईकची किंमत 7.40 लाख रुपयांपर्यंत आहे. मोटो मोरीनी कंपनीच्या बाईक्स प्रीमियम क्लासच्या बाईक्स आहेत.
Jontes 350R Streetfighter
चायनीज बाईक मेकर जोन्टेसने गेल्या महिन्यात आपली हाय रेंज बाईक 350R Streetfighter बाईक सादर केली आहे. या बाईकची किंमत 3.15 लाख रुपये आहे. ही एंट्री लेव्हल मोटरसायकल आहे. या बाईकमध्ये कंपनीने 348 cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. जे 9,500 rpm वर 37.4 bhp ची कमाल पॉवर आणि 7,500 rpm वर 32 Nm टॉर्क निर्माण करते. या बाइकमध्ये कंपनीने ट्रान्समिशनला 6-स्पीड गिअरबॉक्सला इंजिनसोबत जोडले आहे.
Ducati Multistrada V4 S
डुकाटी इंडियाने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आपली मल्टीस्ट्राडा V4S साहसी बाईक देखील लॉन्च केली आहे. याला कंपनीचे अपडेटेड मॉडेल म्हणता येईल. यामध्ये कंपनीने नवीन फीचर्स आणि नवीन कलर्स असलेले मॉडेल देखील समाविष्ट केले आहेत, परंतु नवीन कलरसह मॉडेल घेण्यासाठी तुम्हाला 1.5 लाख रुपये जास्त द्यावे लागतील.
TVS रायडर125
टीव्हीएस रायडर बाईकमध्ये गेल्या महिन्यातच आणखी एक बाईक समाविष्ट करण्यात आली असून तिला TVS Raider 125 SmartXonnect असे नाव देण्यात आले आहे. या बाईकमध्ये तुम्हाला TFT डिस्प्ले, राइडिंग मोड्स सारखे अनेक फीचर्स मिळतात. कंपनीने या बाईकची सुरुवातीची किंमत 99,990 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) ठेवली आहे.
महत्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI