Popular MPV Waiting Period: प्रीमियम (Car) कारच्या (Auto News) वाढत्या (Premium car) मागणीमुळे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा एक्सयूव्ही 700, स्कॉर्पिओ-एन आणि ह्युंदाई क्रेटासह अनेक एसयूव्ही आणि एमपीव्ही लाँग वेटिंग पिरेड देत आहेत. टोयोटाच्या प्रीमियम  एमपीव्ही, इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉसलाही (Toyota Innova Hycross) ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आहे, तर मारुती सुझुकी इन्व्हिक्टो (Maruti Suzuki Invicto) प्रीमियम एमपीव्हीलाही देशात मोठी मागणी आहे. आज आम्ही या तिन्ही एमपीव्हीच्या वेटिंग पिरेडबद्दल सांगणार आहोत. 


मारुती इन्विक्टो (Maruti Invicto)



मारुती सुझुकीकडे सध्या इन्व्हिक्टो थ्री-रो एमपीव्हीसाठी 5000 हून अधिक ऑर्डर प्रलंबित आहेत. हे मॉडेल टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. MSIL  दरमहा इन्व्हिक्टोच्या सुमारे 500 ते 700 युनिट्सची विक्री करत आहे, म्हणजेच सुमारे 7 ते 8 महिन्यांचा वेटिंग पिरेड देण्यात आला आहे. टॉप-स्पेक अल्फा+ व्हेरियंट बेस्ट-सेलर आहे.


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross)


टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला देशभरातील कारप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जबरदस्त फिचर्ससोबत येते आणि बऱ्याच  सेगमेंटमध्ये चांगली आहे. ही  MPV हायब्रिड आणि पेट्रोल इंजिन अशा दोन्ही पर्यायांसह सादर करण्यात आली आहे.


इनोव्हा हायक्रॉसच्या हायब्रिड व्हेरियंटचा वेटिंग पीरियड 65 आठवडे म्हणजेच 1 वर्षापेक्षा जास्त आहे. तर हायक्रॉसच्या पेट्रोल व्हेरियंटचा वेटिंग पीरियड 26 आठवडे म्हणजेच 6 महिन्यांपर्यंत आहे. हा MPV दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे; यात 2.0 लीटर पेट्रोल आणि 2.0 लीटर पेट्रोल हायब्रिडचा समावेश आहे. 


टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta)


इनोव्हा क्रिस्टा सध्या देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी टोयोटा MPV आहे. हे मॉडेल फ्लीटसाठी अधिक लोकप्रिय असून केवळ एका डिझेल इंजिन पर्यायासह तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या एमपीव्हीसाठी सध्या 7 महिन्यांपर्यंतप्रतीक्षा कालावधी आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये 2.4 लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे जे 148 बीएचपी पॉवर आणि 343 एनएम टॉर्क जनरेट करते. यात आरडब्ल्यूडी सिस्टिम आणि 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.  


यासोबतच अनेक गाड्या नव्या वर्षात लाँच होणार आहे. नव्या फिचर्ससोबतच नव्या कार बाजारात येणार आहे. सोबतच इलेक्ट्रिक कारदेखील लाँच होणार आहे. त्या कारसाठीदेखील अनेक कारप्रेमी आतूर आहेत. त्यामुळे त्या कारसाठीदेखील प्रीबुकींग सुरु झालं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Auto News : Skoda आणि Volkswagen पुढच्या वर्षी 'या' 5 नवीन कार लॉन्च करणार; इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये करणार एन्ट्री


 

 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI