OLA MAP: कॅबपासून इलेक्ट्रिक स्कूटरपर्यंत प्रवास करणारी ओला आता नव्या तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिक या वर्षी अनेक कारणावरून चर्चेत आहे. काही स्कूटरच्या डिलिव्हरीसह गेल्या वर्षी उशिरा सुरू झालेल्या ओला इलेक्ट्रिकचा प्रवास, आता देशातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड पर्यंत पोहोचला आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत ओला पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यशासोबतच ओलाचे नावही काही वादात अडकले आहे. विशेषत: इलेक्ट्रिक वाहने आणि रिव्हर्स मोडमध्ये आग लागल्याने. या सगळ्यानंतरही ओला इलेक्ट्रिक सतत पुढे जात आहे आणि आता कंपनी आपल्या स्वतःच्या मॅपिंग सेवेवर काम करत आहे.
ओला इलेक्ट्रिक आपला मॅप लॉन्च करणार?
Onsitego च्या अहवालानुसार, कंपनी स्वतःची मॅपिंग सेवा तयार करत आहे. सध्या MapMyIndia च्या डेटानुसार Ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नेव्हिगेशन आणि मॅप फीचर्स उपलब्ध आहे. हे फीचर्स Move OS 2 मध्ये वापरले जात आहे. हे फीचर्स Ola S1 Pro च्या काही मॉडेल्समध्ये बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर काम पुढील महिन्यात सुरू होऊ शकते.
सध्या मॅप माय इंडियावर सुरू आहे काम
Ola ने सुरुवातीला MapMyIndia ने नेव्हिगेशन आणि मॅप पुरवठ्यासाठी त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरले आहे. परंतु कंपनी ते बदलण्याचा विचार करत आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दुसरे उत्पादन जोडताच, हा बदल त्यात दिसू शकतो.
ओला टेस्लाचा मार्ग अवलंबेल का?
इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola जवळजवळ त्याच धोरणाचा अवलंब करत आहे, जी Tesla Motors ने फॉलो केली आहे. टेस्लाला स्वतःची नेव्हिगेशन सेवा असल्यामुळे खूप फायदा झाला आहे. आपल्या नेव्हिगेशन प्रणालीचा फायदा घेऊन, टेस्लाने आपल्या मॅपवर जलद चार्जिंग स्टेशन, चार्जर्स चालू कार्यरत स्थिती, सेवा केंद्रे जोडली आहेत. ओला देखील अशाच मॅपिंग सेवेवर काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ola बनवणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! कारखान्यासाठी कंपनी शोधत आहे जागा
- Luxury Car: 1.2 कोटी रुपये किमतीची BMW X6 नदीत फेकली, कारण जाणून व्हाल थक्क
- Driving Licence: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करायचे आहे? हा आहे सोपा मार्ग
Car loan Information:
Calculate Car Loan EMI