Ola Electric Car: इलेक्ट्रिक टू-व्हीलर यशस्वी झाल्यानंतर ओला इलेक्ट्रिक आता देशात आपली दुसरी सुविधा सुरू करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी आता आपल्या इलेक्ट्रिक फोर-व्हीलर व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनी नवीन प्लांटसाठी जागा शोधत आहे. नवीन जागेचा शोध पूर्ण झाल्यानंतर कंपनी तिथे आपला इलेक्ट्रिक कार निर्मतीचा प्लांट सुरू करणार आहे. तसेच तिथेच ईव्हीसाठी बॅटरी बनवेल. याआधी ओला इलेक्ट्रिकच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली होती की, आगामी इलेक्ट्रिक कार नवीन फ्यूचर कारखान्यात तयार केली जाईल.


कंपनी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार


ओला इलेक्ट्रिकने नवीन प्लांटसाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. आत्तापर्यंत ओला इलेक्ट्रिक उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्य सरकारांसोबत चर्चा करत आहे. याबाबत महिनाभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.


1,000 एकरची आवश्यकता


मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात नवीन सुविधा सुरू केली जाऊ शकते. ओला इलेक्ट्रिक नवीन प्लांटसाठी जमिनीसाठी अनेक राज्य सरकारांशी बोलणी करत आहे. EV चारचाकी कारखान्यासाठी सुमारे 1,000 एकर जमिनीची आवश्यकता आहे, जे FutureFactory पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. जिथे ते S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर तयार करते.


फ्युचर फॅक्टरी आहे जगातील सर्वात मोठा प्लांट 


ओला इलेक्ट्रिकने कृष्णगिरी, तामिळनाडू येथे फ्यूचर फॅक्टरी स्थापन केली होती, जी डिसेंबर 2020 पासून कार्यरत आहे. ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादन सुविधा मानली जाते. ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी 15 डिसेंबरपासून त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली. EV निर्माता आता भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे, ज्याची दर महिन्याला 10,000 पेक्षा जास्त युनिट्स विकली जातात.


कंपनी स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवणार 


ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि संस्थापक भावीश अग्रवाल यांनी यापूर्वी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन बनवण्याची योजना असल्याचं सांगितलं होत. कन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचा फोटोही त्यांनी शेअर केला होत. शेअर केलेल्या फोटोवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, ओला इलेक्ट्रिक कदाचित प्रथम बॅटरी इलेक्ट्रिक हॅचबॅकवर काम करेल, जी परवडणारी ईव्ही असू शकते. ओला सध्या आगामी इलेक्ट्रिक वाहनाच्या डिझाइनवर काम करत आहे. येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI