एक्स्प्लोर

दिवाळीत होणार धमाका, ओला लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक वाहन

Ola Upcoming Vehicle: इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ओला धुमाकूळ घालत आहे. कंपनीच्या EV स्कूटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ओला इलेक्ट्रिक या दिवाळीत नवीन उत्पादन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Ola Upcoming Vehicle: इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ओला धुमाकूळ घालत आहे. कंपनीच्या EV स्कूटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ओला इलेक्ट्रिक या दिवाळीत नवीन उत्पादन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, कंपनी 22 ऑक्टोबर रोजी नवीन इलेक्ट्रिक उत्पादन लॉन्च करणार आहे. यासोबतच काही नवीन उत्पादने आणि योजनाही समोर येतील. नवरात्रीच्या दरम्यान भाविश यांनी ट्वीट केले होते की, या महिन्यात काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहे. ते म्हणाले होते की, या उत्पादनामुळे इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला किमान 2 वर्षांनी गती मिळू शकते.

भाविश अग्रवाल यांनी नवीन वाहन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली असली, तरी हे वाहन कार असले की, स्कूटर याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र वाहन बाजारात अशी चर्चा आहे की, ओला नवीन  नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. जी S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विद्यमान रेंजपेक्षा किफायतशीर असेल. या व्यतिरिक्त, कंपनी आपल्या विस्ताराच्या काही नवीन योजना देखील उघड करू शकते. 

अलीकडेच कंपनीने चेन्नईमध्ये आपले पहिले अनुभव केंद्र सुरू केल्याची घोषणा केली होती. या योजनेनुसार कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात अशा 200 सुविधा उभारणार आहे. याव्यतिरिक्त, ओलाने अलीकडेच तामिळनाडूमध्ये संपूर्ण महिला कामगार वर्ग असलेला कारखाना सुरू केला आहे. ओला फ्युचर फॅक्टरीची स्थापना आठ महिन्यांच्या कालावधीत झाली. यामध्ये सध्या 2,000 महिलांना रोजगार मिळाला आहे. ओला टीम नजीकच्या भविष्यात ही संख्या 10,000 पर्यंत नेण्याचा आणि जगातील सर्वात मोठा दुचाकी ईव्ही कारखाना बनवण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कारवरही काम करत आहे. भाविश यांनी या कारचा खुलासा ओला फ्युचर फॅक्टरी येथे एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात परवडणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासोबतच ओला इलेक्ट्रिक लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार आहे. आगामी काळात कंपनी भारतात एक EV सेल उत्पादन कारखाना स्थापन करू शकते. जिथे बॅटरी 100% अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केली जाईल. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बाहेरून आयात केल्या जातात.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget