OLA : डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत असताना सध्या इलेक्ट्रिक वाहने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. कंपन्या देखील या विभागातील वाहनांच्या निर्मितीवर त्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत. आता ओला कंपनी देखील या वाहनांसाठीही प्रयत्न करत आहे. Ola ने घोषणा केली आहे की, कंपनी आता Quick Commerce व्यवसाय आणि Ola Dash Used Cars बंद करत आहे.


ओला डॅश बंद करण्याचा निर्णय


कंपनीने हा व्यवसाय 1 वर्षापूर्वीच सुरू केला होता. या संदर्भात कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ओलाने आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले आणि विचार केल्यानंतर ओला डॅश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या कार व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असून आपली गो-टू मार्केटिंग धोरण मजबूत करत आहे, कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व्हिस नेटवर्क आणि इलेक्ट्रिक विक्री लक्षात घेऊन ओलाच्या कारची पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान तयार केले जात आहे. यावरून ओलाचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो की, कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे.


एकूण 500 कोटींचा महसूल


ओला कंपनीच्या मते, ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये तिच्या कमाईचा 50% भाग घेते. नुकत्याच जाहीर झालेल्या काही आकडेवारीतूनही ही वस्तुस्थिती खरी ठरते. ओला कंपनीने एप्रिल ते मे 2022 दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये एकूण 500 कोटींचा महसूल मिळवला आहे. त्याच वेळी, कंपनीने असेही म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस हा महसूल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7834 कोटींचा महसूल मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.


इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातही प्रवेश करण्याचा विचार


ओला कंपनीशी संबंधित आणखी एक गोष्ट म्हणजे, आता ओला इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. काही वेळापूर्वी आयोजित एका कार्यक्रमात ओलाने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कारपैकी एकाची झलक शेअर केली. रिपोर्ट्सनुसार, 15 ऑगस्ट रोजी कंपनी यासंबंधीची माहिती देऊ शकते.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI