Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी तज्ज्ञांच्या पथकाला याचे कारण सापडले आहे. तज्ज्ञांच्या या पथकाने आपल्या अहवालात खुलासा केला आहे की, आग लागलेल्या जवळपास सर्व स्कूटरच्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टममध्ये दोष आढळून आले आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या डब्यात कूलिंग किंवा व्हेंट सिस्टम नसते. ज्यामुळे बॅटरीचे तापमान कमी ठेवण्यासाठी आवश्यक वेंटिलेशन होत नाही आहे.


या अहवालात पुढे म्हटले आहे की, बॅटरीच्या डब्यात वेंटिलेशन नसल्यामुळे, बॅटरीमधील काही घटक जास्त गरम होतात आणि जळू लागतात, हे स्कूटरला आग लागण्याचे मुख्य कारण आहे. या पथकाने असेही म्हटले आहे की, अनेक ब्रँड त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना किमान अग्निसुरक्षा देत आहेत आणि वाहनांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी खर्चात कपात करत आहेत.


हा तपासाचा प्राथमिक अहवाल असून येत्या काही दिवसांत अंतिम अहवाल सरकारला सादर केला जाईल, असे पथकाने सांगितले आहे. सरकारने तज्ज्ञांच्या पथकाच्या शिफारशी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांसोबत शेअर केल्या आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल केला आहे.


ई-वाहनांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील


गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्यांना मोठा दंड ठोठावला जाईल आणि इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्यास सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेश दिले जातील, असा इशारा दिला होता. परिवहन मंत्रालय लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहे. जी ऑगस्ट 2022 मध्ये जारी केली जाईल.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI