Upcoming Mahindra Electric SUVs : दिग्गज वाहन कार निर्माता कंपनी महिंद्राने गेल्या वर्षी SUV ची आगामी बॉर्न-इलेक्ट्रिक श्रेणीचे अनावरण केले. यामध्ये XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांसारख्या मॉडेलचा समावेश होता. महिंद्रा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्‍ये येत्या काही वर्षात निवडण्‍यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या जागतिक कार्यक्रमात, महिंद्राने सांगितले की, ते सध्याच्या सर्व ICE SUV इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च करणार आहेत. सर्व इलेक्ट्रिक ICE SUV कंपनीच्या नवीन INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असतील.


सिंगल किंवा ड्युअल मोटर पॉवरट्रेनचा समावेश 


आगामी Thar.e, Scorpio.e आणि Bolero.e मध्ये पॉवरट्रेन पर्याय म्हणून सिंगल किंवा ड्युअल-मोटर सेटअप मिळू शकतात. या इलेक्ट्रिक पॉवरट्रेन फोक्सवॅगन आणि व्हॅलेओकडून मिळतील. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या जागतिक परिषदेत उघड केल्याप्रमाणे, एकूण तीन पॉवरट्रेन पर्याय मिळतील. फोक्सवॅगन कडून मिळणारा फ्रंट मोटर सेटअप 110 PS आणि 135 Nm निर्मिती करेल. तर मागील मोटर सेटअपला 285 PS आणि 535 Nm आउटपुट मिळेल. या SUVची लॉन्च टाईमलाईन अजून माहित नसली तरी महिंद्राचे पुढील इलेक्ट्रिक मॉडेल XUV.e8 असेल , जे XUV700 ची इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या इलेक्ट्रिक व्हर्जनची नुकतीच चाचणी झाली. 


महिंद्रा तिच्या इलेक्ट्रीफाईड ICE SUV साठी नवीन लोगो वापरणार आहे. सध्याच्या XUV400 वर आढळणाऱ्या कॉपर फिनिशमध्ये ट्विन-पीक्स लोगो उपलब्ध राहील. जरी महिंद्रा ICE SUV ची विक्री सुरू ठेवणार आहे. परंतु कंपनीच्या म्हणण्यानुसार, 2027 पर्यंत महिंद्राला 25% इलेक्ट्रिक SUV विक्री गाठायची आहे.


प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांचं एंथम 


महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स, गायक ए आर रहमान यांच्या सहकार्याने, त्याच्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजसाठी एक अभिनव साउंडट्रॅक तयार करत आहे. ज्यामध्ये ड्राईव्ह साउंड आणि एक्सपीरियंस मोडसह 75 पेक्षा जास्त डिझाईन केलेल्या ध्वनीसह तयार केलेल्या ध्वनीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्हीचा अनुभव आणखी वाढविण्यात येणार आहे. ब्रँड अँथम, "ले छलांग" हे एआर रहमान यांनी हरमन आणि डॉल्बी प्रयोगशाळांच्या संयुक्त विद्यमाने तयार केले आहे. तसेच, यामध्ये डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. अलीकडेच, महिंद्राने त्याच्या फ्लॅगशिप ऑफ-रोड एसयूव्ही थारवर आधारित SUV Thar.e ही इलेक्ट्रिक संकल्पनाही अनावरण केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mahindra Thar.e: फ्युचरिस्टिक लूक, मस्क्युलर डिझाइन अन् भरपूर अद्ययावत फिचर्स; महिंद्राची दमदार 'थार इलेक्ट्रिक' SUV लॉन्च!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI