Ola Electric Scooter S1 Pro: ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 प्रोच्या किंमतीत वाढ केली आहे. या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीने तिसरी पर्चेस विंडो उघडली असून, S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन किंमत जाहीर केली आहे. Ola ने S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत तब्बल 10,000 रुपयांनी वाढ केली आहे. कंपनीने अद्याप दरवाढीमागील कोणतेही कारण जाहीर केलेले नाही. Ola Electric S1 Pro ची नवीन किंमत आता 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.


Ola S1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 1.30 लाख (एक्स-शोरूम) या किंमतीत लॉन्च करण्यात आली होती. ओला कंपनीने पहिल्यांदाच ही दरवाढ केली आहे. ओला इलेक्ट्रिकने सर्व संभाव्य ग्राहकांसाठी नवीन पर्चेस विंडोची घोषणा केली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्यापासूनची ही तिसरी विंडो आहे. ओलाची ही पर्चेस विंडो आठवड्याच्या शेवटपर्यंत खुली राहील. ईव्ही निर्मात्या कंपनीने भारतातील पाच शहरांमध्ये टेस्ट राईड कॅम्प सुरू केले आहेत. ओलाने सांगितले की, ज्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कूटर बुक केली आहे, त्यांना कंपनीकडून ईमेलद्वारे सूचित केले जाईल.


ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वाधिक मागणी!


ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटर 131 किमीच्या रिअल लाईफ रेंजचा दावा करते. या ई-स्कूटरचा सर्वोच्च वेग 115 किमी प्रतितास आहे आणि ही स्कूटर तीन सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास जाऊ शकते. S1 Pro मॉडेलच्या लोकप्रियतेमुळे, ओला इलेक्ट्रिकला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बाजारपेठ प्रस्थापित करण्यात मदत झाली आहे. एप्रिलमध्ये, ओला इलेक्ट्रिकने 12,683 युनिट्स वितरित करून विक्रीच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वोत्तम सेल नोंदवला आहे.


आगीच्या घटनेमुळे स्कूटर परत मागवल्या!


सुमारे 40 टक्क्यांची मासिक वाढ नोंदवत ओलाने इलेक्ट्रिक विभागातील प्रमुख कंपनी ‘हिरो इलेक्ट्रिक’ला मागे टाकले आहे. भारतात सर्वात जलद गतीने 10,000 मासिक विक्रीचा टप्पा गाठणारी ओला ही पहिली ईव्ही निर्माती कंपनी आहे. मात्र, पुण्यातील आगीच्या घटनेमुळे ओला इलेक्ट्रिकला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे 1,441 युनिट्स परत मागवावे लागले आहेत.


हेही वाचा :


TVS ने भारतात लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, 450X Ola S 1 Pro आणि Bajaj Chetak ला देणार टक्कर
Royal Enfield ची 'ही' जबरदस्त बाईक या दिवशी होणार लॉन्च; जाणून कोणते मिळणार फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI