Royal Enfield Upcoming Bike: बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड आजकाल आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन मॉडेल्स जोडण्यात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच रॉयल एनफिल्डने आपली नवीन Scram 411 बाईक भारतीय बाजारपेठेत सादर केली होती. आता त्यांनी नवीन बाईक लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. ही नवीन बाईक भारतात Royal Enfield Himalayan 450 या नावाने येईल, जी टेस्टिंग दरम्यान अनेकदा दिसली आहे. ही बाईक 2023 च्या सुरुवातीला लाँच होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चला तर या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या या बाईकमध्ये सिंगल-पीस हँडलबार, स्प्लिट सीट आणि मोठा टेल रॅक असल्याचे दिसले. याशिवाय ही बाईक संपूर्ण एलईडी लाइटिंगसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सुसज्ज असेल, जे रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये पहिल्यांदाच देण्यात आले आहे. तसेच यात क्रोम-रिंग्ज, गोलाकार इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट डिस्क, टर्न इंडिकेटर आणि नवीन गार्ड सारखे फीचर्स मिळू शकतात.


इंजिन आणि परफॉर्मन्स 


रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 मध्ये ऑफर केलेल्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यात लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर मोटर देण्यात आली आहे. जी 40bhp ची कमाल पॉवर आणि 45Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. इतर अॅडव्हेंचर बाईक्सप्रमाणे हिमालयन 450 कमी आणि मध्यम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी करण्यावर भर देईल. दुसरीकडे, सध्याच्या हिमालयन 411 बद्दल बोलायचे तर, त्यातील मोटर 24.3 bhp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच ती 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सुरक्षा फीचर्सच्या बाबतीत, नवीन मॉडेलला पारंपरिक टेलिस्कोपिक फॉर्क्सच्या तुलनेत आणखी USD फोर्क्स मिळतील. फ्रंट सस्पेंशन ट्रॅव्हल आणि ग्राउंड क्लीयरन्स वरच्या बाजूला असू शकतात.


किंमत 


Royal Enfield Himalayan 450 ची किंमत सुमारे 2.7 लाख रुपये (ex-sh) असण्याची शक्यता आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर ही बाईक KTM 390 Adventure आणि BMW G310GS शी स्पर्धा करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI