Electric Two-Wheelers : इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनामधील दोन विशेषीकृत कंपन्या आघाडीची भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओकिनावा ऑटोटेक आणि इटालियन इलेक्ट्रिक व परफॉर्मन्स मोटरसायकल्स उत्पादक कंपनी टॅसिटा यांच्यामध्ये नुकताच ऐतिहासिक करार करण्यात आला. या संयुक्त उद्यमामधून स्थापना करण्यात आलेली कंपनी भारतामध्ये स्थित असेल आणि 2023 पासून भारतामधून उत्पादनाला सुरूवात करेल.


या नवीन संयुक्त उद्यमाचा मुख्य उद्देश दोन्ही कंपन्यांसाठी जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्याचा, तसेच स्वत:ला इलेक्ट्रिक दुचाकीच्या विश्वामध्ये अव्वल कंपनी म्हणून स्थापित करण्याचा आहे. विशेषत: ओकिनावा इलेक्ट्रिक दुचाकींच्या वर्षानुवर्षे उत्पादन व विक्रीमुळे भावी उत्पादन व त्यांच्या प्रॉडक्शन लाइनचा स्थानिक विकास करेल. टॅसिटा प्रखर स्थितींमध्ये 10 वर्षांचे संशोधन व विकास आणि चाचणीच्या अनुभवासह पॉवरट्रेन – कंट्रोलर, मोटर, बॅटरी पॅक्स व बीएमएस देईल, ज्यामुळे ते अत्याधुनिक उच्च-कार्यक्षम उत्पादनांच्या निर्माणामध्ये निपुण होतील.


या संयुक्त उद्यमामध्ये दोन उत्पादन लाइन्सचा समावेश असेल: स्कूटर्स व मोटरसायकल्स. दोन्ही लाइन्स स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी आहेत. वर्ष 2023 रेंजमध्ये स्कूटर व उच्च कार्यक्षम मोटरसायकलचा समावेश असेल. संपूर्ण रेंजमध्ये ओकिनावा तंत्रज्ञान असलेल्या बाजारपेठेतील सर्वोत्तम कनेक्टीव्हीटी यंत्रणा असतील.


नवीन स्थापना करण्यात आलेल्या कंपनीच्या पुढील प्रयत्नामध्ये 2023 च्या पहिल्या सहामाहीत सादर करण्यात येणारी डिझाइन, विकास, पेटेण्टिंग व रस्त्यावर चाचण्यांचा समावेश असेल, जे ओकिनावा व्यावसायिक टेक्निशियन्स व इटालियन टीमकडून करण्यात येईल. हिवाळ्यामध्ये पडणारे धुके ते भारतातील पावसादरम्यानची आर्द्रता अशा सर्व वातावारणीय स्थितींमध्ये रस्त्यावर चाचण्या घेण्यात येतील. चाचण्यांच्या काही भागांमध्ये भारतातील ओकिनावा मुख्यालयापासून इटलीतील टॅसिटा मुख्यालयापर्यंतच्या उद्घाटनाच्या प्रवासाचा समावेश असेल. दोन्ही कंपन्यांसाठी उद्देश अधिकतम ग्राहक समाधानासाठी अत्यंत विश्वसनीय, उत्साहवर्धक व उपयुक्त उत्पादने देण्याचा आहे आणि नेहमीच राहिला आहे.


आणखी वाचा :


TVS ने भारतात लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, 450X Ola S 1 Pro आणि Bajaj Chetak ला देणार टक्कर
Royal Enfield ची 'ही' जबरदस्त बाईक या दिवशी होणार लॉन्च; जाणून कोणते मिळणार फीचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI