Jeep Meridian : जीप इंडियाने आपली सर्व नवीन 7-सीटर SUV 2022 जीप मेरिडियन भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. जीप कंपनीने या नव्या कारच्या किंमतीही जाहीर केल्या आहेत. नवीन 2022 Jeep Meridian 7-सीटर SUV भारतात 29.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीत लाँच करण्यात आली आहे. या कारसाठीचे प्री-बुकिंग देखील सुरू झाले आहे, तर पुढील महिन्यापासून या गाड्यांची डिलिव्हरी सुरू होणार आहे.


या 7-सीटर SUV  कारची किंमत 29.90 लाखपासून सुरु होते. तर, या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 36.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवीन जीप इंडिया मेरिडियन एसयूव्ही स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या गाड्यांशी स्पर्धा करणार आहे.


गाडीचे खास फीचर्स


जीप मेरिडियन ही कार 2.0-लिटर इंजिनसह येते, जे 170 Bhp पॉवर जनरेट करते. ही कर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या दोन्ही पर्यांयासह उपलब्ध आहे. यात FWD आणि AWD असे दोन प्रकार आहेत. शिवाय ग्राहकाच्या सुरक्षेची काळजी घेत, या गाडीत 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. याशिवाय देखील या एसयूव्हीमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.


जीप कंपासप्रमाणेच जीप मेरिडियनमध्येही काही खास फीचर्स देण्यात आली आहेत. यात 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि असेच काही खास फीचर्स मिळतात. सेफ्टी फीचर्सची काळजी घेत या कारमध्ये 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, TPMS देखील देण्यात आले आहेत.


जीप मेरिडियन 4,769 मिमी लांब, 1,859 मिमी रुंद आणि 1,698 मिमी उंच आहे. या कारमध्ये 2,782 मिमी लांब व्हीलबेस आहे. या कारमध्ये 170-लिटर बूट स्पेस मिळतो. गाडीचा ग्राउंड क्लीयरन्स 203 मिमी आहे. जीप मेरिडियन 2022 ही कार 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिनसह येते, जे 170hp पॉवर आणि 350Nm टॉर्क देते. जीप या ब्रँडच्या माहितीनुसार, या गाडीचा सर्वाधिक वेग 198 किमी प्रतितास आहे आणि 10.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढतो.


हेही वाचा :


Review: नवीन फीचर्स आणि जबरदस्त लूकसह अशी आहे 'Nexon EV Max'


Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI