BMW New Car Technology: ऑटोमोबाईल उद्योगात सातत्याने बदल होत असून नवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक नाविन्यपूर्ण आणि सोयीस्कर बनत आहे. हे ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर देखील आहे. या क्रमाने जर्मनीच्या लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यूने रंग (BMW Color Changing Car) बदलणारी कार सादर केली. ज्यामध्ये फक्त एका टचने तिचा रंग बदलता येतो. चला जाणून घेऊया या कारची काय आहे खासियत...


जर्मन कार निर्मात्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून रंग बदलणाऱ्या कारची  (BMW Color Changing Car) माहिती दिली आहे. BMW ने आपल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे की, या कारचा रंग फक्त एका बटणाच्या टचने बदलला जाऊ शकतो. ई इंक तंत्रज्ञानासह BMW ix Flow कार एका क्षणात आपला रंग (BMW Color Changing Car) बदलू शकते.


BMW New Car Technology: किती रंग बदलू शकते ही कार? 


या कारबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ही कार पांढरा, काळा आणि राखाडी अशा रंगांमध्ये (BMW Color Changing Car) बदलली जाऊ शकते.


BMW New Car Technology: कशी रंग बदलते ही कार? 


बीएमडब्ल्यूने (BMW Color Changing Car) या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया देखील उघड केली आहे. ही इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित प्रक्रिया असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे इलेक्ट्रोफोरेटिक तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. यासाठी वेगळ्या पॉवरची आवश्यकता नाही. याच्या बॅकग्राऊंडमध्ये विविध रंगद्रव्ये (BMW Color Changing Car) देण्यात आली आहेत. ज्यामुळे संपूर्ण वाहनाचा रंग (BMW Color Changing Car) बदलता येतो. कंपनीचे ग्रुप डिझाईन चीफ एड्रियन व्हॅन यांनी सांगितले की, हा BMW ix Flow हा एक अॅडव्हान्स संशोधन प्रकल्प आहे.


दरम्यान, वेगवेगळ्या ऋतूंनुसार या कारच्या रंगाचा (BMW Color Changing Car) वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात कारचा रंग पांढरा केल्यास जास्त सूर्यप्रकाश पडणार नाही, तर हिवाळ्यात हा रंग (BMW Color Changing Car) गडद करून कारची केबिन सूर्यप्रकाशात लवकर गरम करता येते.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Car Ownership Per Household: भारतात फक्त 7.5% लोकांकडेच कार! गोवा आघाडीवर, महाराष्ट्रात किती टक्के लोकांकडे आहे कार?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI