New Nissan Magnite : आगामी दसरा- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण जर कार (Car) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण जापान येथील कार निर्माता कंपनी निसान ने आपली बहुप्रतीक्षित आणि सर्वसामान्यांच्याही खिशाला परवडेल अशी कॉम्पैक्ट एसयूवी निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) कार मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिली आहे. सोबतच कंपनीने जुन्या कारच्या तुलनेत नवीन निसान मॅग्नाइट कारमध्ये मोठे बदल देखील केले आहे. जे या नव्या कारला अधिक आकर्षक करतेय.


या कारबाबत निसान कंपनीने (Nissan) दावा केला आहे की, कारमध्ये जुन्या कारच्या तुलनेत इतर बदल केलेच आहे शिवाय, सेफ्टी आणि कनेक्टिविटी फीचर्सबाबत देखील विशेष बदल केले आहे. सर्वांगाने प्रभावी असलेल्या आणि  कारचा लूकसह दमदार इंजिन असलेल्या या कराची सुरवातीची किंमत आहे 5.99 (एक्स-शोरूम) इतकी आहे. त्यामुळे आपण जर कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा देखील एक पर्याय असू शकतो. 


नव्या निसान मॅग्नाइटचे वैशिष्ट्य काय?


 निसान इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत निसान मॅग्नाइटचे (Nissan Magnite) चे जवळ जवळ 1.5 लाखपेक्षा जास्त युनिट्स विकल्या गेले आहेत. तर आता या कारच्या फेसलिस्ट मॉडेलला नव्या आणि आकर्षक लूकमध्ये पुढे आणले जात आहे. निसान मॅग्नाइटचा ऐकुणात लूक हा पूर्वीच्या कारसारखाच मिळता जुळता आहे. मात्र कंपनेने यात काही कॉस्मेटिक अपडेट केल्याने ही कार जुन्या कारच्या तुलनेत वेगळी आणि अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास कंपनीचा आहे.


या गाडीच्या लूक बद्दल बोलायचे झाले तर, कारच्या समोरील बाजूस फ्रंट ग्रिलमध्ये क्रोमचा बऱ्यापैकी वापर करण्यात आला आहे. ज्याला हेक्सागोनल शेप देण्यात आलेला आहे. याशिवाय नव्या डिजाईनमध्ये हेडलाइट आणि L-शेप के LED डे -टाईम- रनिंग लाइट्स यागाडीच्या पुढील भागाला फ्रेश आणि अधिक आकर्षक लूक देतोय. या शिवाय साइड प्रोफाइलमध्ये नव्या डिजाईनचे अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहे.


पावर आणि माइलेज किती?


या गाडीला कंपनीकडून 1.0 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजनचा वापर करण्यात आला आहे. जो 74Kw चा पावर आणि 95 Nm चेटॉर्क जेनरेट करतो.  कंपनीनं असा दावा केला आहे की, या कॉम्पैक्ट एसयूवीचा मैनुअल ट्रांसमिशन 20 किमी/लीटर आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन 17.4 किमी/लीटरपर्यंत माइलेज देते. या कारच्या इंजनला मिरर बोर सिलेंडर कोटींगसह  क्रैंक शॉफ्ट और इलेक्ट्रिक टर्बो एक्टुएटर्सची जोड दिली आहे. 


हे आहेत आकर्षक फीचर्स


या गाडीचे कॅबिन विशेषत: पर्णपणे लेदर पासून बनविण्यात आले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, एक प्रवासी कारमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्श करतो त्या त्या ठिकाणी लेदरचा वापर करण्यात आला आहे. यात मोठ्या आकाराचा इंफोटेंमेंट सिस्टम,7 इंचचे मल्टी फंक्शन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आकर्षक स्टीयरिंग व्हील, मल्टी कलर एम्बीएंट लाइटिंग, इत्यादिसारखे आकर्षक  फीचर्स दिल्या गेले आहेत.


सुरक्षेच्या बाबतीत दमदार!


कंपनीने असा दावा केला आहे की, या कारमध्ये 40हून अधिक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या एसयुवी मध्ये 6 एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा ,  एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम,  इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, 3 प्वाइंट सीट बेल्ट रिमाइंडर, रियर पार्किंग सेंसर इत्यादि सारखे फीचर्स दिले आहेत.


 


महत्त्वाच्या बातम्या : 


Top Selling Car: 'या' भारतातील टॉप 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV आणि हॅचबॅक कार, पाहा संपूर्ण लिस्ट


Car loan Information:

Calculate Car Loan EMI