Godawari Eblu Feo : आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक (Electric) गाड्यांची क्रेझ आहे. पेट्रोलच्या नियमित वाढणाऱ्या भावांमुळे मध्यमवर्गीयांना इलेक्ट्रिक गाड्या घेणे सध्या परवडते. दीर्घ प्रतीक्षेनंतर, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने अखेरीस मिड-रेंज सेगमेंटमध्ये पहिले इलेक्ट्रिक Eblu Feo लाँच केले आहे. गोदावरी Eblu Feo ची एक्स-शोरूम (Ex-Showroom) किंमत 99,999 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरू आहे आणि 23 ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरू होईल. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी रायपूरच्या कारखान्यात तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत गोदावरीची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर L5M Eblu Rosie तसेच Eblu Spin आणि Eblu Thrill सारखी इलेक्ट्रिक सायकल देशभरात विकली जात होती.
गोदावरी Eblu Feo किंमत (Price)
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, गोदावरी Eblu Feo इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. गोदावरी Eblu Feo एकाच प्रकारात उपलब्ध असेल आणि वितरण 23 ऑगस्टपासून सुरू होईल. तर देशांतर्गत बाजारात 15 ऑगस्टपासून बुकिंग सुरू झाली आहे. ही ई-स्कूटर सायन ब्लू, वाईन रेड, जेट ब्लॅक, टेली ग्रे आणि ट्रॅफिक व्हाईट अशा 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
गोदावरी Eblu Feo फिचर (Feature)
गोदावरी Eblu Feo मध्ये 2.52 kW लिथियम आयन बॅटरी आहे जी 110 Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर ती 110 किमीची रेंज देऊ शकते. ही दुचाकी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यात अनेक राईड मोड्स देण्यात आले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कन्वीनिएंस बॉक्स, मोबाइल चार्जिंग पॉइंट, 7.4 इंच डिजिटल फुल कलर डिस्प्ले, नेव्हिगेशन असिस्टंट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्प्ले, रिव्हर्स इंडिकेटर, बॅटरी SOC इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्ट सेन्सर, मोटर फॉल्ट सेन्सर इतर सुविधा आहेत. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये बॅटरी अलर्ट आणि हेल्मेट इंडिकेटर यांचा समावेश आहे.
गोदावरी Eblu Feo डिझाइन कशी असेल? (How will Godavari Eblu Feo design?)
AHO LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प, 12 इंच, ट्यूबलेस टायर आणि 170 ग्राउंड क्लिअरन्स आहे. गोदावरी Eblu Feo मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, ड्युअल ट्यूब ट्विन शॉकर्स, समोर आणि मागील बाजूस CBS डिस्क ब्रेक, साइड स्टँड सेन्सर इंडिकेटरने सुसज्ज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Car loan Information:
Calculate Car Loan EMI