Ather Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विशेष मागणी आहे. त्यामुळे अनेक वाहन निर्मात्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक वाहनं (Electric Scooter) बाजारात आणतायत. याचं कारण म्हणजे या गाड्या परवडणाऱ्या किंमतीत आणि सुरक्षित असतात. अशीच एक बंगळुरू-आधारित दुचाकी ईव्ही उत्पादक Ather भारतात सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर 450S लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) विक्री देखील लगेच सुरू होणार आहे. सध्या या स्कूटरची बुकिंगही सुरू झाली आहे. तुम्हालाही ही स्कूटर विकत घ्यायची असेल तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Ather Electric Scooter डिझाईन कशी आहे?
नवीन Ather 450S फ्लॅगशिप 450X सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि सारखीच डिझाईन शेअर करेल. याला 450X च्या शार्प स्टाईलसह स्पोर्टी डिझाईन मिळेल. याला Ather 450X पेक्षा वेगळे स्वरूप देण्यासाठी, थोडे वेगळे ग्राफिक्स वापरले जाऊ शकतात.
Ather 450S चा बॅटरी आणि परफॉर्मन्स कसा आहे?
नवीन Ather 450S ला 450X पेक्षा लहान 3kWh बॅटरी पॅक मिळेल. त्यामुळे त्याची रेंजही कमी होईल. अथरचा (Ather) दावा आहे की 450S ला पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी प्रतितास च्या टॉप स्पीडसह 115 किमीची रेंज मिळेल. Ather 450X ला पूर्ण चार्ज केल्यावर 146 किमीची रेंज मिळते, दोन्हीचा टॉप स्पीड समान आहे.
Ather 450S ची वैशिष्ट्ये काय आहेत?
नवीन 450S मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन, डिजिटल डॅशबोर्ड यासह अनेक वैशिष्ट्ये मिळतील. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी 450S मध्ये आढळू शकते, परंतु त्याला 450X चा TFT डिस्प्ले मिळेल. याबरोबरच इतरही अनेक फीचर्स यामध्ये पाहायला मिळतात.
Ather 450S किंमत किती?
Ather 450S ची एक्स-शोरूम किंमत 1.29 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Ather 450S कोणत्या स्कूटरबरोबर करणार स्पर्धा?
Ather 450S लॉन्च केल्यानंतर Ather Electric Scooter ची स्पर्धा TVS iCube, Ola S1 Air आणि इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाल्यानंतर कंपनीकडून देण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Honda Elevate Car : लवकरच भारतात लॉन्च होणार Honda Elevate कार; 'या' कारला देणार जबरदस्त टक्कर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI