मुंबई : कारप्रेमींनो... आता घरबसल्या घेता येणार शोरूममध्ये कार खरेदी करता येणार आहे. कारण एमजी एक्स्पर्ट एसेन्ट्रिक इंजिन्स एक्स्पेरिअन्सतर्फे एमजी मोटर इंडियाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे शक्य होणार आहे. एमजी मोटर इंडियाने आज एमजी एक्स्पर्टच्या लाँचची घोषणा केली. ज्यामुळे ग्राहकांना ह्युमन इंटरएक्शन व एआर तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या घरामधूनच अगदी आरामात कार खरेदीचा अनुभव देईल. जाणून घ्या कसं ते..


घरबसल्या शोरूममध्ये कार खरेदी करण्याचा अनुभव


घरात राहूनही ग्राहकांना 'लाइव्ह स्ट्रिमिंग' एआर ऑन-वेईकलसह प्रत्यक्ष कारला पाहता येणार आहे, ज्याच्या माध्यमातून कारच्या रंगसंगती पाहता येणार आहेत. तसेच याचा फायनल लुक व फिलसाठी कारला अॅक्सेसराईझ करू शकतात. ग्राहकांना स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह खरेदीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट एक्स्पर्टससोबत प्रत्यक्षपणे कनेक्ट होता येणार आहे. कारच्या व्हर्च्युअल लुकव्यतिरिक्त एमजी एक्स्पर्टस् ग्राहकांना ऑन-रोड किंमत, अपेक्षित डिलिव्हरी तारीख व व्हेरिएण्ट तुलना यांची देखील माहिती देऊ शकतात, ज्यामुळे घरामध्येच डिलरशिपमध्ये असल्यासारखा अनुभव मिळू शकतो. तसेच ग्राहक त्यांच्या जवळच्या डिलरशिपमध्ये टेस्ट ड्राइव्हही बुक करू शकतात. या साधनामध्ये एकसंधी उत्पादनाचा शोध घेण्याची सुविधा देण्यासाठी सर्वोत्तम ऑडिओ व व्हिज्युअल कन्टेन्ट आहेत, ज्यामुळे व्हर्च्युअल व फेस-टू-फेस इंटरअॅक्शन करता येते.


एमजी एक्स्पर्ट' लाँच


एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, "आम्हाला मानव-संचालित, आवाज-सक्षम, असे नवे प्लाटफॉर्म 'एमजी एक्स्पर्ट' लाँच करण्याचा आनंद होत आहे. ऑटो-टेक ब्रॅण्ड म्हणून एमजीने भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये क्रांती केलीय. आमच्या ब्रॅण्ड तत्त्वामध्ये ग्राहकांना तंत्रज्ञान-एकसंधी अनुभव देण्याला प्राधान्य देत एमजी एक्स्पर्ट उत्पादनाच्या वैशिष्ट्यांपासून मालकीहक्कापर्यंत विविध चौकशीसाठी एक-थांबा सुलभ व सोईस्कर सोल्यूशन म्हणून कार्य करते. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आपल्या सोयीने सुधारित, माहितीपूर्ण, परस्परसंवादी व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत प्रॉडक्ट एक्स्प्लोरेशन अनुभव देण्यास उत्सुक आहोत. असे ते म्हणाले.


हे ही वाचा :




  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

  •  


 


एमजी एक्स्पर्ट व्यासपीठ एमजी मोटर इंडियाच्या 'पॉवर ऑफ चॉईस'च्या तत्त्वावर डिझाइन करण्यात आले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या घरातच अगदी आरामात वाहने खरेदी करण्यापूर्वी विविध कारचा अनुभव घेण्यासोबत योग्य निर्णय घेण्यामध्ये सक्षम ठरते.



Car loan Information:

Calculate Car Loan EMI