Maruti XL6 review : XL6 ला मारुती सुझुकीने लाँच केल्यापासून इतर कार ला टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. कारण या कारचा लूक जरी SUV सारखा दिसत असला तरी काहीशा प्रमाणात या दोघांमध्ये फरक आहे. मारूती कारमध्ये उच्च इंधन क्षमता आहे. मारुतीने XL6 मध्ये नवीन इंजिन आणि शेवटी, नवीन स्वयंचलित गिअरबॉक्ससह अनेक प्रकारात बदल केले आहेत. इतकेच नाही तर XL6 मध्ये आता अधिक इंटीरियर फीचर्स देखील दिले आहेत. या कारचे अजून काय वैशिष्ट्य आहे जाणून घ्या.
फ्रंटीयर लूक डिझाईन :
XL6 चे मॉडेल लवकर ओळखण्यासारखे आहे. परंतु, असे असले तरी या कारचा लूक मात्र आकर्षक आहे. कारच्या समोर नवीन एलईडी रिफ्लेक्टर हेडलॅम्प आहेत. तर मोठ्या क्रोम बारसह विस्तीर्ण नवीन लोखंडी जाळी अधिक प्रीमियम लूक मिळविण्यात मदत करते. फॉक्स स्किड प्लेट आणि बाजूला क्लेडिंग 'SUV सारखी' दिसते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कारला 16 इंची आकाराचे ड्युअल टोन Alloy Wheels आहे. रिअर टेल लॅम्प ह्या एलईडी असून त्यांना ग्रे लेन्स आहेत. मागील बाजूस ग्रे फिनिशसह स्मार्ट नवीन एलईडी टेललॅम्प देखील मिळतात. नवीन ड्युअल टोन शेड्स असताना, Nexa ब्लू हा सर्वोत्कृष्ट कलर आहे कारण हा कलर निश्चितपणे अधिक प्रीमियम लूक देतो.
इंटर्नल फीचर्स कोणते?
इंटिरिअरला ऑल ब्लॅक थीम आहे जी Ertiga पेक्षा वेगळी आहे. परंतु, नवीन सिल्व्हर फिनिश आहे जी संपूर्ण डॅशबोर्डवर चालते आणि स्टीयरिंग व्हीलवर देखील असते. नव्या Maruti XL6 मध्ये 1.5 लिटर ड्युलजेट पेट्रोल इंजिन आहे. त्याशिवाय, 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. स्टेअरिंग माउंटेड पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे. म्हणजे या कारला अधिक चांगला मायलेज मिळणार आहे. ऑटोमॅटिक कारसाठी 20.27 किमी प्रति लिटर आणि मॅन्यूअल कारसाठी 20.57 किमी प्रति लिटर इतका मायलेज कार देईल असा दावा करण्यात आला आहे. अॅम्बियंट लाइटिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, टेलिस्कोपिक स्टिअरिंग, फोर एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) हिल होल्ड असिस्ट (HHA) यासारखी प्रीमियम वैशिष्ट्ये जोडली आहेत. कारमध्ये फ्रंट सीटसाठी अधिक वायूविजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय कूलिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासह इतरही फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये सहा एअर बॅग देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये फीचर्सह सुरक्षितेच्या दृष्टीने अधिक महत्त्व देण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंगचा अनुभव
XL6 फक्त एका पेट्रोल इंजिनसह सुरू आहे. परंतु, ते आता 1.5l युनिट 103bhp/137Nm सह नवीन इंजिन आहे. हे नवीन पेट्रोल एक स्मार्ट हायब्रिड असण्यासोबत ड्युअलजेट तंत्रज्ञानासह येते ज्याचा अर्थ असा होतो की ते स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. 5-स्पीड मॅन्युअल सोबत, 6-स्पीड ऑटोमॅटिकचा ड्रायव्हिंग अनुभवात खूप मोठा बदल आणतो आणि पॅडल शिफ्टर्स देखील ऑफर केले आहेत.
किंमत किती ?
Maruti XL6 ची सुरुवातीची किंमत 11.2 लाख रुपये आहे. तर,टॉप-एंड मॉडेलची किंमत 14.55 लाख रुपये आहे. Maruti XL6 ही कार नवीन एर्टिगा आणि किया कॅरेन्स या कारशी स्पर्धा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतात होणार लॉन्च; 'या' दिवसापासून सुरु होईल प्री-बुकिंग
- मारूतीने लाँच केली Maruti XL6; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
- Review: मारुतीने लॉन्च केली अपडेटेड 'एर्टिगा', जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या काय आहे नवीन
Car loan Information:
Calculate Car Loan EMI