Hyunadai Update : ऑटोमेकर कंपनी Hyunadai ने अलीकडेच निर्णय घेतला आहे की, ती आता आपल्या ग्राहकांना फक्त एक स्मार्ट की देणार आहे. या निर्णयानंतरही कंपनी चर्चेत राहिली आहे. ह्युंदाई आता आपल्या ग्राहकांना एकच स्मार्ट की देणार का? याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अखेर कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कंपनी आता आपल्या ग्राहकांना फक्त एकच चावी देणार आहे. याचे कारण नेमके काय ते जाणून घ्या.   


कंपनीने हा निर्णय का घेतला?


वास्तविक, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने प्रत्येक क्षेत्राला प्रभावित केले आहे. त्याचा परिणाम वाहन उद्योगावरही दिसून येत आहे. संपूर्ण उद्योग सध्या सेमीकंडक्टरच्या कमतरतेशी झुंज देत आहे, ज्याला तोंड देण्यासाठी Hyundai ने ही युक्ती अवलंबली आहे. यातून ब्रेक घेत ऑटो निर्माता कंपनी ह्युंदाई Hyundai i20, Alcazar आणि Creta या तीन कारच्या ग्राहकांना सध्या फक्त एकच चावी देत ​​आहे. 


दुसरी चावी कधी मिळेल?


कंपनीने हा निर्णय फक्त Hyundai च्या SUV Creta, MPV Alcazar आणि i20 या कारच्या बाबतीत घेतलेला आहे. दुसऱ्या चावीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी 6 महिन्यांनंतर ग्राहकांना दुसरी चावी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 


Hyundai च्या SUV Creta, MPV Alcazar आणि i20 या सगळ्यात टॉप मॉडेलच्या कार आहेत. ग्राहकांना या कारची विशेष पसंती आहे. यापैकी Hyundai Creta एप्रिल 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च होताच कंपनीने 12,651 युनिट्स विकल्या होत्या. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI