Upcoming Mahindra Bolero : देशातील आघाडीची कंपनी महिंद्राच्या कार भारतातील लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. या कारची लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. नुकतीच महिंद्रा सर्वात लोकप्रिय कार महिंद्रा बोलेरो अपडेट करणार आहे. या नंतर ही कार अधिक आकर्षक दिसणार आहे. कंपनी आगामी बोलेरोमध्ये काय अपडेट करणार आहे ते जाणून घेऊयात. 


महिंद्रा अँड महिंद्राने जुलै 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत नवीन बोलेरो निओ (Mahindra New Bolero Neo) सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली होती. सध्या या कारचे पाच व्हर्जन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कारची किंमत साधारण 9.29 लाख रुपयांपासून सुरु होते ती 11.78 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमती एक्स शोरूमच्या आहेत. 


अपडेटेड व्हर्जन कसे असेल? 


महिंद्रा आपली आगामी बोलेरो निओ सब-कॉम्पॅक्ट SUV नवीन मॉडेल लॉन्च करत आहे. कंपनीने कारच्या संदर्भातील अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. 


डायमेंशन : 


आगामी महिंद्रा बोलेरो निओ प्लस 7-सीट आणि 9-सीट कॉन्फिगरेशन ऑप्शन्ससह येईल. याबरोबरच लगेज एरियामध्ये साईड फेसिंग बेंच टाईप सीट देखील दिसेल. त्याच वेळी, नवीन बोलेरोची लांबी 4400 मिमी आणि रुंदी 1795 मिमी उंची 1812 मिमी असेल. त्याच वेळी, त्याचा व्हीलबेस 2680mm राहील. 5-सीटर व्हर्जनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 3995 मिमी लांब, 1795 मिमी रुंद आणि 1817 मिमी उंच असेल. हे P4 आणि P10 ट्रिममध्ये लॉन्च केले जाईल. 


बोलेरो निओ प्लसची वैशिष्ट्ये :


वैशिष्ट्यांमध्ये, निओ प्लस 9-सीटर बोलेरो नवीन MID डिस्प्लेसह दिसेल. यात एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल पॉवर स्टीयरिंग व्हील, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इको मोडसह एसी आणि बरेच काही मिळेल. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकार उपलब्ध असतील.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI