Maruti Suzuki : दिग्गज कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बीएसई फाईलिंगमध्ये मारूती सुझुकीच्या कंपनीकडून असे स्पष्ट करण्यात आले की, महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या दरांमुळे वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मारूती सुझुकीने सोमवारी (आज) या संदर्भात माहिती दिली की कंपनी जानेवारी 2024 पासून कारच्या किंमतीत वाढ करणार आहे.
बीएसई फाईलिंगमध्ये कंपनीने कारच्या किंमती वाढविण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या दरांमुळे वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मारुती सुझुकीच्या सर्वच गाड्यांच्या मॉडल्सच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
किंमत साधारण किती असेल?
मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांची किंमत साधारण साडे तीन लाख ते 29 लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. वाढलेल्या कारच्या किंमतीमध्ये अल्टोपासून ते इन्व्हिक्टो गाडीपर्यंतचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीकडून कोणत्या गाडीच्या माॅडेलमध्ये किती रुपयांची वाढ होणार याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
मारुतीने यापूर्वीही दरवाढ केली आहे
यावर्षी 1 एप्रिल 2023 रोजी मारुती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या होत्या. तसेच, जानेवारी 2023 मध्ये कंपनीने सांगितले होते की, कारच्या सर्व मॉडेल्सच्या वाहनांच्या किमती सुमारे 1.1% ने वाढवल्या आहेत.
ऑडी गाड्याही महागणार
सोमवारी, जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने देखील वाढत्या इनपुट आणि ऑपरेशन खर्चाचा अहवाल देत पुढील वर्षी जानेवारीपासून भारतात आपल्या वाहनांच्या किमती 2% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. ऑडी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, किमतीतील वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल आणि सर्व मॉडेल श्रेणींमध्ये असेल. तरी, महागाई आणि आॅटोमोबाईल क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने नव्याने गाडी घेणाऱ्या ग्राहकांना मात्र फटका बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI