कलर ऑप्शन, पॉवर आणि मायलेज
मारुती सुझुकी ब्रेझा 6 सिंगल कलर आणि 3 ड्युअल कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. या 5 सीटर एसयूव्हीची बूट स्पेस 328 लीटर आहे. मारुती ब्रेझा मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. ही एसयूव्ही 103 पीएसची जास्तीत जास्त पॉवर आणि 137 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह, आय-ब्रेझाच्या मॅन्युअल व्हेरियंटचे मायलेज 17.38 किमी/लीटर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज 19.8 किमी/लीटर आणि सीएनजी मॅन्युअल व्हेरिएंटचे मायलेज 25.51 किमी/किलो आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 9 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, 4-स्पीकर साउंड सिस्टम, सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, एम्बियंट लाइटिंग, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ईएससी, हिल होल्ड असिस्ट, ईबीडीसह एबीएस आणि पार्किंग सेन्सर आहेत.
मारुती सुझुकी ब्रेझा पेट्रोल व्हेरियंटची शोरूम किंमत
ब्रेझा एलएक्सआय मॅन्युअल- 8.29 लाख रुपये
ब्रेझा वीएक्सआय मॅन्युअल- 9.64 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय मॅन्युअल- 11.04 लाख रुपये
ब्रेझा वीएक्सआय ऑटोमेटिक- 11.14 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय डीटी मॅन्युअल- 11.21 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय प्लस मॅन्युअल - 12.48 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय ऑटोमॅटिक - 12.54 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय प्लस डीटी मॅन्युअल- 12.64 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय ऑटोमॅटिक डीटी - 12.71 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय प्लस ऑटोमॅटिक - 13.98 लाख रुपये
ब्रेझा झेडएक्सआय प्लस ऑटोमॅटिक डीटी - 14.14 लाख रुपये
सध्या लोक पेट्रोल आणि CNG कार खरेदी करण्यावर भर असतो. त्यात लोक कमी पैशांमध्ये चांगल्या कारच्या शोधात असतात. त्यामुळे आता नवनव्या कार वेगवेगळ्या चांगल्या फिचर्समध्ये उपलब्ध होत आहे. यात ब्रिझा कारला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचं दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI