Electric Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता ऑटो सेक्टरमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक भर देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपली सर्वाधिक विक्री होणारी फॅमिली कार मारुती सुझुकी ओम्नी इलेक्ट्रिक (Maruti Suzuki Omni Electric ) प्रकारात परत आणण्याच्या तयारीत आहे.
Maruti Suzuki Omni Electric Car : मारुती ओम्नी इलेक्ट्रिक कार पॉवर रेंज
कंपनी या कारच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये पॉवरफुल बॅटरी बॅकअप वापरू शकते. यामुळे या कारची पॉवर रेंज 300 किमी ते 400 किमी पर्यंत असू शकते.
Maruti Suzuki Omni Electric Car : मारुती ओम्नी इलेक्ट्रिक कार डिझाइन
काही काळापूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही विद्यार्थ्यांनी मिळून ओम्नी कारसाठी काही डिझाइन्स तयार केले होते. असे बोलले जात आहे की, कंपनी ओम्नीच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये हे डिझाइन वापरू शकते. नवीन ओम्नीमध्ये हेड लॅम्पसह इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल, बंपरखाली फॉग लॅम्प, एलईडी इंडिकेटर्स, बॉडी कलर आऊट रिव्ह्यू व्ह्यू मिरर दिले जाऊ शकतात. तसेच याच्या मागील बाजूस स्लाइडिंग दरवाजा पूर्वीप्रमाणेच ठेवता येतो आणि त्याच्या मागील बाजूस एलईडी टेल लाइट दिला जाऊ शकतो. आकाराच्या बाबतीतही यात बदल पाहिले जाऊ शकतात.
Maruti Suzuki Omni Electric Car : मारुती सुझुकी लॉन्च
Omni च्या या इलेक्ट्रिक व्हेरियंटसाठी मारुती सुझुकीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. पण 2030 च्या अखेरीस कंपनी ही कार सादर करू शकते. टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असो किंवा फोर व्हीलर असो, आता जवळपास सर्वच कंपन्या आपली सर्वाधिक विक्री होणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्यात गुंतल्या आहेत.
या कारशी होणार स्पर्धा
मारुतीची ही कार PMV EAS E शी स्पर्धा करेल, ही शहरी वापरासाठी छोटी ईव्ही आहे. ज्यामध्ये 48 व्होल्टची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे, जी 13.6PS पॉवर आणि 50 Nm टॉर्क जनरेट करते. याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी या तीन प्रकारच्या रेंजचा पर्याय उपलब्ध आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI