Force Motors Trax Cruiser 13 Seater Car : जर तुमचे कुटुंब खूप मोठे असेल किंवा तुम्ही असे कोणतेही काम करत असाल जिथे जास्त लोकांना एकत्र प्रवास करावा लागतो, तर तुम्हाला नक्कीच मोठ्या वाहनाची गरज भासत असेल. यातच जर 7 किंवा 8 सीटर एमपीव्ही देखील तुमची गरज पूर्ण करू शकत नसेल, तर तुम्हाला वेगळ्या पर्यायाचा विचार करणे आवश्यक आहे. यातच एक मोठे वाहन आहे ते म्हणजेच 13 सीटर (13 Seater Car) क्रूझर कार. होय! आज आम्ही अशाच एका वाहनाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये 13 लोक (13 Seater Car) एकत्र बसून आरामात प्रवास करू शकतात. हे वाहन फोर्स मोटर्सचे ट्रॅक्स क्रूझर (Force Motors Trax Cruiser) आहे. ज्यामध्ये 10 आणि 13 सीटर पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊ याकारबद्दल अधिक माहिती...


Force Motors Trax Cruiser 13 Seater Car : इंजिन 


Force Trax Cruiser मध्ये 2596CC, 4 सिलेंडर, BS-VI, कॉमन रेल DI TCIC डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3200 rpm वर 66kW पॉवर आणि 1400-2400 rpm वर 250 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.


Force Motors Trax Cruiser 13 Seater Car : सीटिंग सेटअप 


याच्या  13 सीटर व्हर्जनमध्ये समोरच्या रांगेत (एक ड्रायव्हर), दुसऱ्या रांगेत 3 लोक बसण्यासाठी दोन जागा आहेत, त्यानंतर मागील बाजूस समोरासमोर दोन 4 सीटर बेंच सीट्स आहेत, ज्यामध्ये 8 लोक बसू शकतात. म्हणजे तिन्ही रांगांसह, त्यात 13 लोक आरामात बसू शकतात. यात 10 सीट कॉन्फिगरेशन पर्याय देखील मिळतो.


Force Motors Trax Cruiser Price : किंमत 


Force Motors Trax Cruiser च्या बेस मॉडेलची प्रारंभिक किंमत दिल्ली एक्स-शोरूममध्ये 16.08 लाख रुपये इतकी आहे. जी ऑन रोड सुमारे 18.00 लाख रुपयांपर्यंत जाते. या वाहनाचे एकूण 4 प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या किमतीत बाजारात असलेल्या बहुतांश SUV कार 5 सीटर पर्यायामध्ये येतात. पण त्याच किमतीत 13 सीटरचा पर्याय मिळतो.


दरम्यान, ही कार भारतातील टाटा विंगरशी स्पर्धा करते. टाटा विंगर 2.2L डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 350 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 10 आणि 13 सीटर पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI