Maruti Brezza Booking: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझाच्या आगामी नवीन प्रकारासाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. ही कार या महिन्याच्या अखेरीस लाँच होणारा असून आगामी Brezza मध्ये अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. यात इलेक्ट्रिक सनरूफ सारखे फीचर्स ही देण्यात येणार असल्याचं कंपनीने सागितलं आहे. 


11,000 रुपयांमध्ये बुकिंग


यात 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह नेक्स्ट जनरेशन पॉवरट्रेन देखील मिळेल. ग्राहक 11,000 रुपयांच्या टोकन रक्कमश कंपनीच्या कोणत्याही Arena शोरूममधून किंवा वेबसाइटवरून नवीन Brezza बुक करू शकतात.


इंजिन आणि फीचर्स 


भारतात 30 जून रोजी मारुती सुझुकी इंडिया नेक्स्ट जनरेशन कार Vitara Brezza लाँच करणार आहे. Vitara Brezza मध्ये ग्राहकांना 1.5 लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 103bhp आणि 137Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. गिअरबॉक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एक नवीन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील मिळेल. ही SUV सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि 6 एअर बॅग यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज असेल. यासोबतच नवीन Brezza मध्ये तुम्हाला अपडेटेड नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम देखील पाहायला मिळेल. दरम्यान, या नवीन कारची भारतीय बाजारात किती किंमत असेल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती उघड केली नाही. या कारच्या लॉन्चवेळी ही माहिती कंपनी जाहीर करेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI