Ola Electric Car: दुचाकी सेगमेंटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केल्यानंतर Ola आता चारचाकी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही उतरण्यास सज्ज झाली आहे. ओला आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक चारचाकी असेल. ओला ग्राहक दिनानिमित्त कंपनीने आपल्या आगामी प्रीमियम इलेक्ट्रिक कारचा टीझर व्हिडीओ जारी केला आहे. टीझरमध्ये ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार स्पोर्टी लूकमध्ये खूपच लक्झरी दिसत आहे.


ओला इलेक्ट्रिक आपली S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्यानंतर लवकरच, भारतीय इलेक्ट्रिक चारचाकी सेगमेंटकडे लक्ष देत आहे. ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. कंपनीला त्याच्या S1 स्कूटरची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि वितरण टाइमलाइनबाबत अनेक तक्रारी येत असतानाही, आगामी इलेक्ट्रिक कारवर जोरात काम सुरू आहे.


टीझर व्हिडीओमध्ये ओला इलेक्ट्रिक कार एक अतिशय आकर्षक आणि आलिशान सेडान प्रमाणे दिसत आहे, सुरुवातीला ती Kia EV6 सारखी दिसते. ईव्ही प्रेमी त्याच्या उत्कृष्ट फ्रंट लुकमुळे वाहनाबद्दल अधिक तपशील शोधत आहेत. मात्र कंपनीने याबाबत कोणतीही विशेष माहिती दिलेली नाही.


मुख्य डिझाइन फीचर्समध्ये पुढील बाजूस रुंद LED लाइटिंग, तर मागील भाग किआसारखा दिसू शकतो. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी अधिक तपशील समोर येतील. ओलाने महिंद्राचे माजी डिझायनर रामकृपा अनंतन यांना कामावर घेतले आहे, ज्यांनी सध्याची XUV700, Thar, XUV300 ची डिझाइन केली आहे.


ओला इलेक्ट्रिकचे प्रीमियम उत्पादनासह पॅसेंजर कार विभागात प्रवेश केल्याने कंपनी टॉप-डाउन धोरण अवलंबत असल्याचे दिसत आहे. उत्पादनाची लाँच टाइमलाइन अद्याप उघड झालेली नाही. ही कार अद्याप विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हे लक्षात घेता आम्हाला वाटते की, ही कार बाजारात येण्यासाठी आणखी दोन वर्ष लागू शकतात. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI