Maruti S-Presso VS Renault Kwid : नुकत्याच लॉन्च झालेल्या मारूती सुझुकीच्या S-Presso ने भारतीय बाजारात आपले स्थान टिकवून ठेवले आहे. SUV सारखा लूक देणारी ही कार हॅचबॅक किंमतीच्या दृष्टीने अगदी स्वस्त किंमतीत आहे. तर, मारुतीच्या या कारला भारतीय बाजारपेठेत 2015 मध्ये लाँच झालेल्या रेनॉल्टच्या क्विडला टक्कर देत आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 5 लाख रुपयांपर्यंत आहे. तर, तुमच्यासाठी या दोन कारचे पर्याय आहेत. S-Presso आणि Kwid मधील तुमच्यासाठी कोणती कार चांगली हे या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


इंजिन आणि मायलेज :


मारुतीच्या S-Presso मध्ये 1.0-लीटर K12C पेट्रोल इंजिन आहे. कंपनीचा असा दावा आहे की, ही कार 24.12 kmpl ते 25.30 kmpl मायलेज देते. दुसरीकडे, जर तुम्ही Renault Kwid पाहिली तर, त्यात 800cc आणि 1.0 लिटरच्या दोन पेट्रोल इंजिनचा ऑप्शन मिळतो. कंपनी Kwid कडून 20.7 kmpl ते 22 kmpl च्या मायलेजचा दावा करते.


वैशिष्ट्ये काय आहेत?


अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले या दोन्ही कारमध्ये सपोर्ट आहे. तसेच, या दोन्ही कारमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, EBD सह ABS, ओव्हरस्पीड अलर्ट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Kwid ला 8-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते, तर S-Presso ला 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. Kwid ला सर्व पॉवर विंडो, LED टेल लॅम्प, LED डेटाइम रनिंग लॅम्प आणि मागील पार्किंग कॅमेराची अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. Kwid ला 2,422 mm चा व्हीलबेस मिळतो, तर S-Presso ला 2,380 mm चा थोडा लहान व्हीलबेस मिळतो. Kwid ची लांबी आणि रुंदी S-Presso पेक्षा जास्त आहे परंतु उंची S-Presso पेक्षा कमी आहे. Kwid ला S-Presso पेक्षा 4 मिमी अधिक ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो.


किंमत किती?


नवीन S-Presso 2022 ची सुरुवातीची किंमत रुपये 4.25 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. Kwid च्या बेस व्हेरिएंटची किंमत 4.64 लाख रुपये आहे. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. किमतीच्या दृष्टिकोनातून, S-Presso चे बेस व्हेरिएंट Kwid च्या बेस व्हेरियंटपेक्षा 39,000 रुपये कमी आहे. तर दोन्ही कारचे टॉप व्हेरिएंट 5.99 लाखांमध्ये उपलब्ध आहे.


महत्वाच्या बातम्या :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI