Next Gen Maruti Swift 2023: स्विफ्टच्या अपडेटेड व्हर्जनची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच Next Gen Maruti Swift 2023 घेऊन येत आहे. मारुतीने नेक्स्ट जनरेशन स्विफ्टची चाचणी सुरू केली आहे. ज्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. मारुती पुढील वर्षी अपडेटेड स्विफ्ट लॉन्च करू शकते. यात नवीन लूक, डिझाइन आणि फीचर्सच्या पाहायला मिळणार आहे. नवीन अपडेटेड स्विफ्टमध्ये काय वेगळे आणि खास असेल आणि ही CNG प्रकारातही लॉन्च केली जाणार की नाही? याचीच माहिती जाणून घेऊ.


कसा असेल लूक आणि फीचर्स 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेक्स जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. नवीन स्विफ्ट आकाराने मोठी असेल आणि सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त जागा असेल. याची चाचणी जपानमध्ये सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, स्लीकर हेडलॅम्पसह नवीन बंपर मिळू शकतो. तसेच रूफ माउंटेड स्पॉयलर, ब्लॅक-आउट पिलर्स, नव्याने डिझाइन केलेले अलॉय व्हील्स यासारखे फीचर्स मिळू शकतात. नेक्स जनरेशन मारुती स्विफ्टची मजबूती आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी ही चांगल्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल अशी अपेक्षा आहे.


नवीन स्विफ्ट सीएनजीमध्येही येईल का?


एका रिपोर्ट्सनुसार, नेक्स जनरेशन मारुती स्विफ्ट 1.2 लीटर K12N DualJet पेट्रोल इंजिनसह लाँच केली जाऊ शकते. जे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे इंजिन 89 bhp ची पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन्ही पर्यायांमध्ये येईल. यासोबतच मारुती ही कार फॅक्टरी फिटेड सीएनजीच्या पर्यायात बाजारात आणू शकते, अशीही बातमी मीडियामध्ये येत आहे.  भारतात सीएनजी कारची मागणी वाढली आहे आणि मारुती सुझुकी या सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. त्यामुळे कंपनी आता स्विफ्टसोबत बलेनोचा सीएनजी पर्याय बाजारात आणू शकते, अशी चर्चा आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI